शहरं
Join us  
Trending Stories
1
"वर्षभर वेळ मागितला, तरी दिला नाही; मातोश्रीवर गेलो तिथे ६ तास थांबवलं अन् २ मिनिटे भेटले"
2
भारत-चीन सैन्य मागे घेण्यास सुरुवात; येत्या तीन दिवसांत टेंट, शेड अन् इमारती हटवल्या जाणार
3
Baba Siddiqui : बाबा सिद्दिकी हत्या प्रकरणातील शूटरला देश सोडण्यासाठी पासपोर्ट देण्याचं दिलेलं आश्वासन
4
आदित्य ठाकरेंकडे ५३५ हिरे लगडलेले कडे, दीड किलो सोने...; प्रतिज्ञापत्रात उद्धव ठाकरेंचेही उत्पन्न केले जाहीर
5
विधानसभा निवडणुकीत महायुतीचा स्ट्राइकरेट कसा असेल? मुख्यमंत्री शिंदे यांनी एका वाक्यात सांगितलं 
6
Maharashtra Assembly Election 2024: दिनकर पाटलांमुळे भाजपला फटका? नाशिकमध्ये समीकरण बदललं!
7
"राहुल गांधींच्या विधानाची मोडतोड करून फेक नरेटिव्ह पसरवण्याचा भाजपाचा प्रयत्न’’, नाना पटोले यांचा आरोप
8
कुणीही कितीही काहीही केले तरी लाडकी बहिण योजना बंद होणार नाही, CM शिंदेंचा जनतेला विश्वास
9
सर्वाधिक मताधिक्याने जिंकलेल्या अपक्ष आमदाराला महायुती, मविआत प्रवेश बंदी, काय घडलं?
10
IND vs NZ : कॅप्टन Tom Latham ची बॅट तळपली; न्यूझीलंडनं घेतलीये ३०१ धावांची आघाडी
11
दिल्लीत जाताच मविआचा फॉर्म्युला बदलला; ठाकरे सेनेच्या जागा ९० झाल्या, थोरात म्हणाले...
12
काय सांगता? महिन्याला १ लाख रुपये कमवतात भिकारी; स्मार्टफोनसह पॅनकार्डचाही करतात वापर
13
Maharashtra Assembly 2024: मेघना बोर्डीकर विरुद्ध विजय भांबळे; जिंतूरमध्ये राजकीय गणित कसं?
14
पुण्यात पोलिसांच्या नाकाबंदीत १३८ कोटींचं सोनं पकडलं; सोनं आलं कुठून? तपास सुरु...
15
Sonu Sood : "आपला देश सुरक्षित"; बॉलिवूडवरील गँगस्टरच्या दहशतीवर सोनू सूद रोखठोक बोलला!
16
कोकणात मविआमध्ये बंडखोरी, सावंतवाडीत अर्चना घारे-परब यांनी भरला उमेदवारी अर्ज
17
नाशिक शहरात एकही जागा काँग्रेसला नाही; इच्छुक ठाकरेंच्या उमेदवाराविरोधात अपक्ष लढणार
18
रोहितच्या नावे लाजिरवाणा विक्रम; धोनी-विराटच्या कॅप्टन्सीत असं कधीच नाही घडलं
19
दलित वसाहतीला आग लावणाऱ्या 101 जणांना न्यायालयाने सुनावली जन्मठेपेची शिक्षा...
20
एकेकाळी वेटर म्हणून काम केलं; आता अदानी-अंबानींच्या कंपन्यांनाही टाकलंय मागे

कोरोनाचे संकट; १५ गुंठ्यावरील गुलाबाची रोपं बांधावर काढून फेकली...!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 22, 2020 11:54 AM

लॉकडाऊनच्या फटका; घाम गाळून रोपांना दिले होते घटका-घटका पाणी...

ठळक मुद्देवांजारवाडीतील शेतकºयाने फुले बांधावर फेकली सद्या फुलाचा हंगाम सुरू असून उत्सव आणि बाजारपेठा बंद आहेतनेमक्या कमाईच्या काळात  फुले बांधावर फेकून देण्याची वेळ आली

अक्षय आखाडे 

कोर्टी : अडचणींवर मात करुन फुलांची लागवड केली़़क़डक उन्हाळ्यात पाण्याचे दुर्भिष्य असताना इकडून तिकडून पाणी जमा करुन रोपं जगवली..आता बहर आला, विक्रीचा काळ आला अन कोरोनाचे अरिष्ठ ओढावले..१५ गुंठ्यावरील गुलाबं मातीमोल करुन बांधावर फेकून देण्याची वेळ एका करमाळा तालुक्यातील एका बळीराजावर आली.

नागेश खांडेकर असे त्या शेतकºयाचे नाव़ कोरोनाच्या या फटक्याने त्याचे जवळपास तीन लाखांचे नुकसान झाले आहे.  जगभर थैमान घातलेल्या कोरोनाचा संसर्ग वाढू नये म्हणून सरकारने ३ मे पर्यंत  लॉक डाऊन केले़ या काळात शेतकºयांना शेतमाल बाजार पेठेत पोहाचवताना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते आहे. फळे, भाजीपाला उत्पादक शेतकºयांच्या पाठोपाठ आता फूल उत्पादक शेतकºयांना देखील  आपली फुले बाजारपेठेत नेता आली नाहीत.

 वांजारवाडी (ता़ करमाळा) येथील नागेश खांडेकर याची देखील अशीच काहीशी परिस्थिती झालेली आहे. खांडेकर यांनी १५ गुंठे क्षेत्रात पॉली हाऊस करून त्यामध्ये  गुलाब फुलांची लागवड केली. परंतू उत्पादित फुले बाजारपेठेत नेता आली नाहीत. त्यामुळे या शेतकºयाला गुलाबाची फु ले बांधावर फेकून देण्याची वेळ आली़ लॉक डाउनमूळे विक्री न झाल्याने खांडेकर यांना आता पर्यंत तीन लाखाचा फटका बसला आहे. केलेला खर्च वसूल होण्याऐवजी आता कर्ज बाजरी होण्याची वेळ आल्याचे खांडेकर यांनी सांगितले. 

नियोजन फसले

  • - ते आपल्या शेतीत नेहमी वेगवेगळे प्रयोग करत असतात. अलीकडे लग्न उत्सव आणि उत्सव, सभारंभात गुलाब फुलांना मोठी मागणी आहे़ शिवाय दरवषी उत्तम भाव मिळतो़ हेच सूत्र लक्षात घेता खांडेकर यांनी प्रथम पॉली हाऊस करून त्यात गुलाब फुलांच्या रोपट्याची लागवड केली. चागलं निरोगी फुले मिळावी म्हणून त्यांनी पाण्याचे नियोजन, औषध फवारणी केली़ योग्य काळजी घेतल्याने उत्तम प्रतीची फुले देखील आली.
  • - जानेवारी ते मे महिन्यात फुलांचा हंगाम सुरू होतो. परंतू नागेश खांडेकर यांना त्यांनी पिकवलेली फुले सरकारने केलेल्या लॉक डाऊन मुळे शहरी बाजारपेठेच्या  ठिकाणी नेता आली नाहीत. अखेर गुलाब फुलांना तालुक्याच्या ठिकाणी म्हणावी इतकी मागणी नसल्याने आणि बाजारपेठा बंद असल्यामुळे फुललेली फुले खराब झाल्याने फुले बांधावर फेकून देण्याची वेळ आली आहे.

विविध ठिकाणी मागणी पाहता गुलाब फुलांची लागवड केली़ सद्या फुलाचा हंगाम सुरू असून उत्सव आणि बाजारपेठा बंद आहेत़ फुलला मागणी नाही़ त्यामुळं नेमक्या कमाईच्या काळात  फुले बांधावर फेकून देण्याची वेळ आली आहे.  तीन लाखाचे नुकसान झाले आहे. सरकारने आता शेतकºयांसाठी मदतीचे धोरण आखावे़ - नागेश खांडेकरगुलाब उत्पादक, वांजारवाडी.

टॅग्स :SolapurसोलापूरFarmerशेतकरीagricultureशेतीcorona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस