या कुस्तीस पंच म्हणून गारअकोल्याचे अण्णा गायकवाड व सांगोल्याचे गजानन साळुंखे यांनी काम पाहिले. जिल्ह्यासह शेजारील पुणे, सातारा जिल्ह्यातून अनेक नामवंत मल्लांसह प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळतो. या कुस्ती मैदानात ५० रुपयांपासून ते ५० हजार रुपयांपर्यंतच्या कुस्त्या पार पडल्या.
या मैदानास पार्थ ॲग्रो मिल्क प्रॉडक्टचे सुनील लावंड, डॉ. सचिन शेंडगे, उद्योजक विजेंद्र मगर, शिवाजी गायकवाड, विजय पवार, किसन पवार, मातोश्री इंडस्ट्रीजचे नागनाथ मगर, दादा पवार, दादासाहेब मगर, प्रशांत देवकुळे, पै. गणेश मगर, पै. कैलास मगर, पै. विजय मगर, पै. अक्षय बोडरे, पै. विकास बोडरे यांनी सहकार्य केले. कुस्ती समालोचक म्हणून गाराअकोल्याचे युवराज केचे व आटपाडीचे परशुराम पवार यांनी काम पाहिले.
फोटो ओळ ::::::::::::::::::::
निमगाव येथे आयोजित कुस्ती मैदानात पै. धनाजी मगर व पै. मोईन पटेल यांची कुस्ती लावताना सुनील लावंड, विजेंद्र मगर, गोरख पवार, शिवाजी गायकवाड, अण्णा गायकवाड आदी.