शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणुकीनंतर पवार-शिंदे एकत्र आलेले दिसतील का?; 'लोकमत'च्या मुलाखतीत मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केली भूमिका
2
"शरद पवारांच्या त्या पत्रामुळेच २०१९ मध्ये राष्ट्रपती राजवट लागू झाली", देवेंद्र फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
आजचे राशीभविष्य - १५ नोव्हेंबर २०२४, प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल, नोकरीत वरिष्ठ खुश राहतील
4
हमीभावाबाबत पंतप्रधान मोदींची महत्त्वाची घोषणा; राज्यातील हजारो शेतकऱ्यांना मोठा दिलासा
5
निवडणुकीसाठी मध्य रेल्वेच्या विशेष गाड्या; जाणून घ्या वेळापत्रक
6
आजचा अग्रलेख: राज यांची टाळी, योग्य वेळी!
7
Ola Electric विरोधातील तक्रारींच्या तपासाचे आदेश, कंपनीपुढील समस्या वाढणार का?
8
विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी; निवडणुकीमुळे शाळांना तीन दिवस सुट्टी?
9
पूर्व नागपुरात महायुती-महाविकास आघाडीसमोर बंडखोरांचे आव्हान
10
कार्यकर्ते लागले कामाला, मतदानासाठी बस निघाल्या गावाला!
11
सिमकार्ड कंपनीच्या कर्मचाऱ्यांनीच मारला ३० हजार लोकांच्या डेटावर डल्ला; भारतातील अनेकांची कोट्यवधींची फसवणूक!
12
कुलाब्यात ४ हजार पोलिसांचे टपाली मतदान; उद्यापर्यंत बजावता येणार हक्क!
13
तामिळनाडूच्या तिरची गँगच्या आरोपीला अटक; वाहनांची काच फोडून करायचा चोरी, ६ गुन्ह्यांची उकल
14
"...तेव्हा तुम्हाला हॉस्पिटलला जायची गरज लागणार नाही"; पंतप्रधान मोदींचा उद्धव ठाकरेंना टोला
15
DRDO ला आणखी एक मोठं यश, गाइडेड पिनाका वेपन सिस्टीमची यशस्वी चाचणी
16
अचानक मोठा विकेंड जाहीर! १५ ते २० नोव्हेंबर 'या' शाळा बंद राहणार; शासनाचा मोठा निर्णय
17
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'काल माझं अन् शरद पवारांचं भांडण झालं, त्यांनी सात सभा..."; सुप्रिया सुळेंनी सगळंच सांगितलं
18
गुंतवणूकदार विचित्र परिस्थितीत अडकले! शेअर ६१ हजारांनी पडला पण विकताही येत नाहीय...
19
दिल्ली महापौरपदासाठी भाजपचा उमेदवार अवघ्या ३ मतांनी हरला; आपची महापालिकेवर सत्ता
20
“मोदींनी ११ वर्षात काय केले? महाराष्ट्राच्या निवडणुकीचा ३७० कलमाशी काय संबंध?”: खरगे

अतिवृष्टी, पुरामुळे सोलापूर जिल्ह्यातील ११ हजार हेक्टरावरील पिकांचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 22, 2020 10:52 AM

१५ हजार शेतकरी बाधीत: बार्शी, पंढरपूर, सांगोला, दक्षिण सोलापूर, माळशिरसचा समावेश

सोलापूर: जिल्ह्यात दोन दिवसापूर्वी झालेल्या अतिवृष्टीने  व माण आणि भीमेला पूर येऊन १५ हजार ३0२ शेतकºयांच्या ११ हजार २१ हेक्टरावरील विविध पिकांचे नुकसान झाल्याचा प्राथिमक अंदाज असल्याची माहिती जिल्हा कृषी अधिकारी रवींद्र माने यांनी दिली.

 जिल्ह्यात दि. १७ व १८ सप्टेंबर रोजी सहा तालुक्यात जोरदार पाऊस झाला. अतिवृष्टीने सांगोला, माळशिरस, पंढरपूर, मंगळवेढा, बार्शी आणि मंगळवेढा तालुक्यात मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. माळशिरस, मंगळवेढा, सांगोला आणि दक्षिण सोलापूर तालुक्यातील काही भागात जोरदार पर्जन्यवृष्टी झाली. या पावसाने तलाव, नाले भरून वाहिले आहेत. शेतीमध्ये मोठ्या प्रमाणावर पाणी साचले आहे. काही ठिकाणी पीके वाहून गेली आहेत. त्यामुळे शेतकºयांचे प्रचंड प्रमाणावर नुकसान झाले आहे. याच जोडीला उजनी व वीर धरणातून पाणी सोडण्यात आल्यामुळे पंढरपूर व दक्षिण सोलापूर तालुक्याला पुराचा मोठा फटका बसला आहे.

नदीकाठची शेती मोठया प्रमाणावर वाहून गेली आहे. भीमेची पातळी अचानक वाढल्याने शेतातील वस्तीवर असणारी जनावरे, ट्रॅक्टर, पंप, पाईपलाईनबरोबरच डाळींब, केळीच्या बागा वाहून गेल्या आहेत. गेल्या दोन दिवसात कृषी विभागाने केलेल्या पंचनाम्याची प्राथमिक आकडेवारी हाती आली आहे. नुकसानीची माहिती अजूनही घेतली जात असून हा आकडा वाढण्याची शक्यता असल्याचे कृषी अधिकारी माने यांनी स्पष्ट केले.  

१७२ गावांना बसला फटका

पाच तालुक्यातील १७२ गावांना अतिवृष्टी व पुराचा फटका बसला आहे. यामध्ये माळशिरसमध्ये ९, दक्षिण सोलापूर तालुक्यात २५, सांगोल्यात ११, मंगळवेढ्यात १७, पंढरपूरमध्ये ६३ तर बार्शीत ४७ गावांचा समावेश आहे. जिल्ह्यात सुमारे १३ हजार हेक्टरावर खरिपाच्या कांद्याची लागवड झाली होती. यातील ८१५ शेतकºयांच्या ४९0 हेक्टर क्षेत्रावरील कांद्याचे नुकसान झाल्याचे दिसून येत आहे. 

विमा कंपन्याचे सर्वेक्षण सुरू

अति पावसाने नुकसान झालेल्या पीकांचे विमा कंपनीमार्फत सर्वेक्षण सुरू आहे. अद्यापही बºयाच पिकांमध्ये मोठ्या प्रमाणावर पाणी साचलेले आहे. बºयाच शेतांमध्ये तळी असल्याने पीकांपर्यंत पोहोचता येत नाही अशी परिस्थिती आहे. काही भागात बांध, नाल्यात साचलेल्या पाण्यामुळे शेतांना पाणी लागले आहे. यामुळे या शेतात रब्बीचा पेरा करणेही अवघड होणार आहे. 

असे झाले तालुकानिहाय नुकसान...

माळशिरस, बाजरी: ७२१ शेतकरी (हेक्टर:५८६), मका:२0७ (१३४), उस: ६३ (३९), डाळींब: ५३ (२६), द्राक्ष: ४९ (२५), एकूण: १0९३ (८१0).दक्षिण सोलापूर, तूर: १८७५ शेतकरी, ( हेक्टर: १३५९), मूग: १६९ (९0), उडिद: ६१0 (३८८), मका: ५४२ (३0७), सोयाबीन: ४४ (४२.८0), भुईमूग: ४५५ (२६९), बाजर: ७७ (४१), सूर्यफुल: २ (३), भाजीपाला: १४५ (८0), कांदा: ६६५ (३९१), पेरू: २(१), एकूण: ४५८६ (२९७१.८0).सांगोला, ढोबळी मिरची: २४ (१४), द्राक्ष: ४३ (२२), बाजरी: ९३ (६९), मका: १0५ (७३), डाळींब: ८३ (५४), एकूण: २४३ (१५९).मंगळवेढा, सूर्यफुल: ३१२ (२00), बाजरी: ५७ (४0), कांदा: ४३ (२५), इतर भाजीपाला: ११७ (८५),एकूण: ५२९ (३५0).पंढरपूर,उस: २४३५ (१८९९), डाळींब: १६५५ (११५३), द्राक्ष: १५९२ (१२१0), भाजीपाला: ५४७ (३११), चारापीके: ५00 (२९५), मका: ५१२ (३0९), एकूण: ७२४१ (५१७७). बार्शी, उडिद:२४ (१८), सोयाबीन: १४७९ (१४६२), कांदा: १0७ (७४)

टॅग्स :SolapurसोलापूरagricultureशेतीFarmerशेतकरीRainपाऊस