करमाळयात उपजिल्हा रूग्णालय व जेऊर ग्रामीण रुग्णालयासह तालुक्यातील ग्रामीण भागात केम, जिंती, कोर्टी, साडे व वरकुटे या पाच प्राथमिक आरोग्य केंद्रात गेल्या महिनाभरापासून कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोहीम सुरू आहे. सुरवातीस उपजिल्हा रूग्णालयात दररोज शंभर व ग्रामीण भागातील प्राथमिक आरोग्य केंद्रात प्रत्येकी पन्नास या प्रमाणे लसीकरण केले जात होते. गेल्या आठ दिवसापासून लसीकरण दुपटीने वाढविण्यात आलेले आहे. उपजिल्हा रूग्णालयात दोनशे तर ग्रामीण भागातील प्राथमिक आरोग्य केंद्रातून शंभर जणांना लस टोचण्यात येत आहे. उपजिल्हा रूग्णालयात २ हजार ३५० जणांना कोरोना प्रतिबंधक लस टोचण्यात आलेली आहे अशी माहिती उपजिल्हा रूग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ.अमोल डुकरे यांनी दिली.
करमाळा उपजिल्हा रूग्णालयासह जेऊर ग्रामीण रूग्णालय व प्राथमिक आरोग्य केंद्रात लस घेण्यासाठी नागरिक गर्दी करीत आहेत पण लस उपलब्ध नसल्याचे समजल्यानंतर आलेले नागरिक निराश होऊन परत जात आहेत.करमाळा उपजिल्हा रूग्णालयासह जेऊर ग्रामीण रूग्णालय व प्राथमिक आरोग्य केंद्रात लस घेण्यासाठी नागरिक गर्दी करीत आहेत पण लस उपलब्ध नसल्याचे समजल्यानंतर आलेले नागरिक निराश होऊन परत जात आहेत.
---
जेव्हा लस तेव्हा डोस
सोलापूर येथून करमाळयात कोरोना प्रतिबंधक लस पुरवठा न झाल्याने बुधवार व गुरूवार या दोन दिवसापासून लसीकरण मोहीम बंद पडली आहे. शुक्रवारीसुध्दा लस मिळणार नाही. जेव्हा वरून लसीचा पुरवठा होईल तेव्हा लसीकरण मोहीम पुन्हा सुरू करू असे तालुका आरोग्य अधिकारी डॉ.सागर गायकवाड यांनी सांगितले.
----
कोरोना संसर्ग वाढत असल्याने नागरिक मोठ्या प्रमाणात कोरोना प्रतिबंधक लस टोचून घेण्यास उत्सुक असताना लस उपलब्ध होत नाही हे दुदैव आहे. लोकांच्या जीवाशी राजकारण्यांनी खेळू नये.
- संजय घोलप,तालुकाध्यक्ष मनसे.
०८करमाळा-लस
करमाळा उपजिल्हा रूग्णालयासमोर लस घेण्यासाठी लागलेली रांग.