शहरं
Join us  
Trending Stories
1
अजित पवारांना बसणार मोठा झटका! 'तुतारी हाती घ्यायची का?', रामराजेंना कार्यकर्त्यांनी दिला 'होकार'
2
आता नेतन्याहू फ्रान्सवर भडकले! लेबनॉनमध्ये फ्रेन्च कंपनीवर इस्रायची बॉम्बिंग, नेमकं काय घडलं?
3
काँग्रेस आमदार हिरामण खोसकर अचानक शरद पवारांच्या भेटीला; कारण आले समोर
4
बच्चू कडूंना CM शिंदेंनी दिला जबर झटका! प्रहारचा 'हा' आमदार शिवसेनेत करणार प्रवेश?
5
चेंबुरमध्ये पहाटे अग्नितांडव; चाळीत लागलेल्या आगीत एकाच कुटुंबातील सात जणांचा मृत्यू
6
"त्यांना लाज वाटली पाहिजे", पंतप्रधान नेतन्याहू फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्षांवर भडकले
7
दुकानातल्या रॉकेलने केला घात; छेदिराम गुप्तांनी पत्नी, मुलगा, सून नातवडं सर्वांनाच गमावलं
8
Women's T20 World Cup Points Table- भारताच्या गटात न्यूझीलंड ऑस्ट्रेलियाचा दबदबा
9
पाकिस्तानमध्ये मोठं काय घडणार? अमेरिकेने नागरिकांसाठी ॲडव्हायजरी जारी केली
10
काहीही करा, आरक्षणाच्या मर्यादेची भिंत तोडणारच! जात जनगणनाही करायला भाग पाडू: राहुल गांधी
11
अल्लू अर्जुन नाही बॉलिवूडचा हा सुपरस्टार बनला असता 'पुष्पा', जाणून घ्या का नाकारला सिनेमा
12
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: सामाजिक क्षेत्रात मान - सन्मान; दुपार नंतर मात्र संयमित राहावे
13
लाडकी बहीण योजनेचे पैसे खात्यातून काढता येईना; किरीट सोमय्या महिलांसह पोहोचले पोलीस ठाण्यात
14
जुन्नर विधानसभेतही शरद पवार धक्का देणार! नवं कार्ड बाहेर काढणार?; बेनकेंविरोधात 'हा' उमेदवार मैदानात उतरवणार
15
नवरात्रात विनायकी चतुर्थी: ६ राशींना लाभ, सुख-समृद्धी-सौभाग्य; पाहा, साप्ताहिक राशीभविष्य
16
हरयाणात भाजपाला पराभूत करत काँग्रेसची सत्ता, तर जम्मू-काश्मीरमध्ये काँग्रेस-नॅकॉ युतीला कौल
17
मविआकडून केवळ दिशाभूल, विकासकामे रोखणाऱ्या शत्रूला निवडणुकीत रोखा: PM नरेंद्र मोदी
18
मराठी भाषेने स्वराज्यासह संस्कृतीची चेतना जागविली; पंतप्रधान मोदी यांचे कौतुकोद्गार
19
PM मोदी यांच्या हस्ते मेट्रो ३ मार्गिकेचे उद्घाटन; प्रवासात शाळकरी मुले, महिलांशी संवाद
20
दुर्गादेवी विरोधकांचा राजकीय संहार करेल; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मविआवर टीका

सोलापूर जिल्हा परिषदेच्या पदाधिकाऱ्यांच्या दालनात नेत्यांच्या छायाचित्रांची गर्दी

By admin | Published: April 11, 2017 1:52 PM

.

आॅनलाइन लोकमत सोलापूरसोलापूर दि ११ : आघाड्यांची सत्ता जिल्हा परिषदेत स्थापन झाल्यामुळे जि़प़ पदाधिकाऱ्यांची दालने अन् भिंती विविध नेत्यांच्या छायाचित्रांनी भरली आहेत. सर्व सभापतींनी पदभार घेतल्यामुळे आपापल्या गॉडफादरची छवी लावून ‘प्रेम’ व्यक्त केले आहे़जि. प. भाजप आघाड्यांची सत्ता आहे़ राष्ट्रवादीशिवाय सत्ता स्थापन केली असली तरीही विविध दालनातील फोटो पाहिल्यावर अजूनही राष्ट्रवादीची सत्ता असल्याचे दिसून येते़ भाजपचे आनंद तानवडे हे पक्षनेते असल्यामुळे त्यांनी वगळता कोणीही पंतप्रधान असो की मुख्यमंत्री असो वा सहकार मंत्री की पालकमंत्री कोणाचेही छायाचित्रे लावले नाहीत़जि़प़ अध्यक्ष संजय शिंदे यांच्या कार्यालयात शरद पवार, अजित पवार, सुप्रिया सुळे, बबनदादा आणि त्यांचा स्वत:चेच छायाचित्र आहे़ याशिवाय शंकरराव मोहिते-पाटील, विजयसिंह मोहिते-पाटील, विठ्ठलराव शिंदे यांच्या प्रतिमा आहेत़ पक्षनेते कार्यालयात आनंद तानवडे यांनीच फक्त भाजपच्या सर्व नेत्यांचे ‘प्रदर्शन’ आपल्या कार्यालयात घडवून आणले आहे़ महिला व बालकल्याण सभापती रजनी देशमुख यांच्या कार्यालयात सुधाकर परिचारकांची प्रतिमा आहे़ समाजकल्याण सभापती शीला शिवशरण यांच्या कार्यालयात आता नव्याने बबन आवताडे आणि समाधान आवताडे यांचे फोटो झळकू लागले आहेत़ अजून विविध समित्यांच्या सदस्यांची निवड बाकी आहे, त्यामुळे काही सभापतींनी अद्याप आपले फोटो प्रेम राखून ठेवले आहे़ त्यामुळे आता फोटो प्रेम दाखविणाऱ्यांनी विकासावर प्रेम करावे, अशी मागणी जिल्हावासीयांची आहे़ गेल्या आठवड्यात दालनावरुन पक्षनेते तानवडे आणि कृषी समिती सभापती मल्लिकार्जुन पाटील यांच्यात वाद झाला होता़ मात्र सोमवारी जि़प़ अध्यक्ष संजय शिंदे यांनी पडदा टाकला ़ पूर्वीच्या पध्दतीने कार्यालये देण्यात आल्यामुळे तानवडे यांना पूर्वीचेच पक्षनेत्यांचे तर पाटील यांना कृषी समिती सभापती कक्ष मिळाला आहे़ ---------------------------अगोदर बबनदादा नंतर म्हेत्रेकृषी व पशुसंवर्धन समितीचे सभापती मल्लिकार्जुन पाटील यांच्या दालनात सकाळी आ़ बबनराव शिंदे यांचा फोटो होता़ सभापतींच्या खुर्ची मागे हा भलामोठा फोटो होता मात्र सायंकाळी या फोटोच्या ठिकाणी आ़ सिध्दाराम म्हेत्रे झळकले़ बबनदादांच्या फोटोंची जागा बदलली़ त्यांच्या दालनात सुशीलकुमार शिंदे, अजित पवार यांचे फोटो आहेत़ पक्षनेते आनंद तानवडे यांनी तर कहरच केला आहे़ त्यांच्या दालनात त्यांनी चक्क एक डझनाहून अधिक फोटो लावले आहेत़ मुंडे, वाजपेयी, मोदी, खा़ बनसोडे, फडणवीस, पालकमंत्री, सहकारमंत्री आदींचे फोटो आहेत.