गेल्या आठवड्यात लसीकरणासाठी कुंभारीत प्राथमिक आरोग्य उपकेंद्र आणि गोदुताई परुळेकर विडी घरकूल येथील सिद्धेश्वर शाळेत या दोन केंद्रात व्यवस्था करण्यात आली होती. त्यात बदल करून सिद्धेश्वर शाळेचे केंद्र कुंभारीच्या जिल्हा परिषद शाळेत सुरू केले. उपकेंद्रात स्थानिकांची तर जिल्हा परिषद शाळेत शहरी नागरिकांची लसीकरणासाठी नोंद घेण्यात येत असे. मोजक्या लसींचे डोस आल्याने दोन्ही केंद्रांत गर्दी वाढली.
बुधवारी ५०० डोसेस आले. गुरुवारी २०० डोसेस आल्याने गर्दी वाढली. शहरी नागरिकांनी आधी नोंदणी केल्याने रांगेत त्यांना प्राधान्य देण्यात आले. स्थानिकांनी आरोग्य कर्मचाऱ्यांशी वादावादी सुरू केली. लसीकरण बंद करा म्हणत गोंधळ घातला. आरोग्य कर्मचाऱ्यांनी पोलिसांना पाचारण केले. विडी घरकूल चौकीचे एपीआय हंचाटे यांनी गर्दीवर नियंत्रण करून ग्रामस्थांची समजूत घातली. त्यानंतर लसीकरण सुरू झाले.
----