ग्रामपंचायत निवडणुकीसाठी तब्बल ३२ पानांचा ऑनलाइन प्रणालीद्वारे अर्ज भरावा लागला. प्रथमच किचकट, ३२ पानी व संगणक चालकावर अवलंबून अर्ज भरण्याची जिकिरीची प्रक्रिया निवडणूक आयोगाने राबवली. यामुळे ऑनलाइन अर्ज भरण्यासाठी माहिती असलेले संगणक चालकही उपलब्ध झाले नाहीत. मात्र सोमवारी रात्रीनंतर ऑनलाइन प्रक्रिया बंद पडल्याने ऑफलाइन अर्ज घेण्यास परवानगी देण्यात आली. याशिवाय ऑफलाइन अर्ज सुटसुटीत होता. यामुळे सकाळपासून अर्ज भरण्यासाठी गर्दी झाली. सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत अर्ज भरण्याची वेळ असल्याने चार वाजल्यानंतरही तहसील कार्यालयाला जत्रेचे स्वरूप आले होते.
ऑफलाइन पद्धतीने अर्ज दाखल करण्याची संधी मिळाल्याने अर्जाची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढली. यामुळे काही गावांत बिनविरोधसाठी झालेल्या प्रयत्नावर पाणी फिरले आहे.
चौकट
पोलिसांच्या दंडेशाहीचा फटका
अर्ज दाखल करण्यासाठी सकाळी तहसील कार्यालय परिसरात आलेल्या महिला व पुरुषांना पाणी व खायला आणण्यासाठी बाहेर जाण्यास पोलीस मज्जाव करीत होते. झेराॅक्स, पाणी आणण्यासाठी बाहेर गेलेल्यांना आत प्रवेश दिला जात नव्हता.
- दुचाकी व चार चाकी गाड्या लावण्यासाठी पार्किंगची सोय नसल्याने जागा मिळेल तेथे लावलेल्या गाड्यांचे फोटो काढून दंड आकारण्यात आला.
----
पडसाळी ग्रामपंचायत बिनविरोध होण्यासाठी गावकऱ्यांनी प्रयत्न केल्याने सहा जागांसाठी सहा अर्ज दाखल झाले. एका जागेवर इच्छुक असलेल्या समाधान रोकडे व धर्मा रोकडे यांच्या नावाच्या चिठ्ठ्या टाकल्या. त्यात धर्मा रोकडे यांचे नाव निघाल्याचे सांगण्यात आले.
----