शेतकऱ्यांनी पिकविलेल्या धान्याला कधी दुष्काळाचे, अतिवृष्टी तर कधी बाजारभावाचे संकट असते. आता तर शेेतातील उभ्या पिकाला रानडुक्कर नासधूस करीत आहेत. सध्या या परिसरातील शेतकऱ्यांनी ज्वारी, मका, तूर, गहू भुईमूग पिकांची पेरणी केली, परंतु हातातोंडाशी आलेला घास ही आता रानडुकरे कळपा कळपाने नासाडी करून वैताग देत आहेत. डुकरे हुसकून शेतकरी डबा,फटाके वाजवणे, बुजगावणे उभे करणे असे विविध उपाय करीत आहेत. रात्रभर जागून त्यांना हुसकावून लावताना ते अंगावर येतात. त्यामुळे जीवालाही धोका निर्माण झाल्याचे शेतकरी सुशील शिंदे यांनी सांगितले.
कोट ::::::::
वन्यप्राण्यांना प्रतिबंध करू शकत नाही. फारतर शेतकऱ्यांचे जे काही नुकसान झाले, त्याची भरपाई देऊ शकतो. त्यासाठी संबंधितांनी रितसर अर्ज करावा. आम्ही त्यांची भरपाई देऊ.
- अनिता शिंदे,
वन अधिकारी