सोलापूर जिल्ह्यात रोज हजारो कोरोना रुग्ण आढळून येत आहेत. त्याचबरोबर अनेक जणांचा कोरोनाने मृत्यू होत असल्याचे निदर्शनास येत आहे. त्यामुळे कोरोनाचा संसर्ग कमी करण्यासाठी व कोरोनाची साखळी तोडण्यासाठी सोलापूर जिल्ह्यात आठ दिवसांचे कडक लॉकडाऊन करण्यात येणार आहे. यामुळे शहरातील नागरिकांनी भाजीपाला व अत्यावश्यक वस्तू खरेदी करण्यासाठी शुक्रवारी बाजारात गर्दी केली होती. यादरम्यान कोरोनाच्या नियमाचे पालन न झाल्याचे दिसून आले. यामुळे कदाचित आणखी रुग्ण वाढण्याची शक्यता आहे. त्याच बरोबर नगर परिषदे समोरील रस्त्यावर बराच वेळ वाहतूक ठप्प झाली होती. शहरात गर्दी झाल्याचे पाहून तत्काळ पोलीस प्रशासनाने बाजारात बंदोबस्त तैनात केला. यामुळे गर्दी कमी झाल्याचे दिसून आले.
फोटो :::::::::::::::::::::
पंढरपूर नगर परिषदेच्या समोरील रस्त्यावर गर्दी झाल्याचे दिसत आहे.