सोलापूर : 'कोरोना' व सारी या विषाणूजन्य आजाराच्या पार्श्वभूमीवर सोलापूर शहरातील प्रत्येक नागरिकांची होम टू होम सर्व्हे करून वैद्यकीय तपासणी करण्यात येणार आहे. यासाठी महापालिकासह जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाची मदत घेण्यात येत आहे. सोमवारपर्यंत हा सर्व्हे पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात आले असून सोमवारपर्यंत तरी सोलापूर शहरातील संचारबंदी कायम राहणार असल्याची माहिती पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली.
सोलापूर शहरात आणखी ४ कोरोना बाधित रुग्णांची वाढ झाली आहे. आता सोलापुरातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या 37 झाली आहे. आज जिल्हाधिकारी कार्यालयात पालकमंत्री भरणे यांनी बैठक घेत कोरोना विषाणूबाबत आढावा घेतलाा. त्यानंतर ते पत्रकारांशी बोलताना पुढे म्हणाले की, कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता सोलापूर शहरातील होम टू होम सर्व्हे होणे गरजेचे असून याकरिता योग्य ती खबरदारी घेऊन महापालिका कर्मचारी यांच्यासोबत जिल्हा परिषदेचीही ३०० ते ४०० जणांची टीम काम करणार आहे. यासाठी सर्व सोलापूरकरांनी सहकार्य करावे असे आवाहनही त्यांनी केले. आज संपणाऱ्या तीन दिवसीय संचारबंदीबाबत ते म्हणाले म्हणाले की, सोमवारी २७ एप्रिलपर्यंत होम टू होम सर्व्हे होईपर्यंत तरी संचारबंदी राहणार असल्याचे सांगितले.