प्रात्यक्षिक स्वरूपात सीताफळ रोपवाटिकाच्या मिळालेल्या ज्ञानावर पूर्ण गावकरी उत्कृष्ट दर्जाची रोपे तयार करण्याचा हातखंडा पुरुषांसह महिलादेखील अवगत झाला आहे. गावातील प्रत्येक शेतकऱ्याने कोण एक गुंठा, तर कोणी २० गुंठे असे शेकडो अत्याधुनिक हरितगृहाची उभारणी केली आहे.
गोरमाळे गावाचे अनुकरण करून शेजारचीदेखील टोनेवाडी, ममदापूर, खामगाव, वानेवाडी गावातील शेतकरी सुद्धा या व्यवसायात पदार्पण सुरू केले आहे. लॉकडाऊन काळात गोरमाळे गावासोबत शेजारच्या १० ते १२ खेड्यांतील शेकडो मजुराच्या हाताला काम मिळाले. कमी कष्ट व कमी उत्पादन खर्च असल्याने अनेक सुशिक्षित बेरोजगार तरुण वर्ग, शेतकरी वर्गाचा ओढा फळ पिकांच्या लागवडीकडे झुकला असून, त्यांनी या व्यवसायाला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड दिली आहे. तयार करण्यात आलेल्या रोपांना पूर्ण देशभरातून मागणी आहे.
---
असे चालते काम
एप्रिलमध्ये मातीच्या पिशवी भरणे, जूनमध्ये माती भरलेल्या पिशव्यामध्ये बाळा नगरी सीताफळ बियाणे लागवड करणे, जानेवारी महिन्यापासून कलम करणे हीच कार्यप्रणाली गेले तीन वर्षांपासून गावात सुरू आहे.
---
प्रत्येक रोपवाटिकेत गुणवत्तापूर्ण सीताफळ रोपाची निर्मिती करण्यात इथला शेतकरी व्यस्त व्यस्त आहे. तरी महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागाच्या वतीने कुठल्याही प्रकारची मदत मिळत नाही. या विभागाने परिसराचा अभ्यास करून रोपवाटिका क्लस्टर करण्याची नितांत गरज आहे.
-प्रमोद बनसोडे, रोपवाटिका धारक, शेतकरी गोरमाळे
---
फोटो : १५ कारी
गोरमाळे (ता बार्शी) येथे कुटुंब तेथे सीताफळ रोपवाटिका