कमी पाण्यावर चांगले उत्पन्न मिळवून देणाऱ्या सीताफळ शेतीकडे मोठ्या प्रमाणावर शेतकरी वळताना दिसत आहेत. यामध्ये नवनवीन जातींची लागवड करून अधिक उत्पन्न घेण्यासाठी शेतकरी नियोजन करत आहेत. मागील बहरातील फळे तुटल्यानंतर खत व पानगळ अशा विविध टप्प्यांनंतर फळधारणेसाठी अत्यंत महत्त्वाचा समजली जाणारी छाटणी प्रक्रिया सध्या अंतिम टप्प्यात आली आहे. झाडांना आकार देण्यासाठी व किडीचा उपद्रव कमी होण्याच्या दृष्टीने छाटणी अत्यंत महत्त्वाची असते.
कोट ::::::::::::::::::
बहराचे पाणी सुरू करण्यापूर्वी १५ ते २० दिवस अगोदर झाडांची छाटणी केली जाते. फळांच्या वाढीसाठी बागेत हवा मोकळी, खेळती राहते. बागेची स्वच्छता महत्त्वाची असून, बागेत पडलेली रोगट व किडकी फळे गाडून किंवा जाळून नष्ट केली जातात.
- महादेव पवार
शेतकरी, इस्लामपूर
सीताफळाचा प्रवास
जानेवारी ते मेदरम्यान सीताफळ छाटणीचे काम सुरू असते. छाटणीनंतर पालवी येते. त्यातूनच नवीन फुलांची निर्मिती होते. फळे साधारण सुपारीच्या आकाराची झाल्यानंतर फळांची विरळणी अत्यंत महत्त्वाची आहे. विरळणी करताना चांगल्या आकाराची, देखणी फळे ठेवावीत. वेडीवाकडी, कीड व रोगग्रस्त फळांची विरळणी करावी लागतात. सदरची फळे नोव्हेंबर, डिसेंबर महिन्यांत काढणीस येतात.