सोलापूर : मोफत शिक्षणाचा अधिकारी अंतर्गत (आरटीई) बारावीपर्यंतच्या मुलांना मोफत शिक्षण देण्याच्या मागणी करण्यात आली आहे. ही मागणी मान्य व्हावी यासाठी एक तरुण सोलापूर ते मुंबई सायकलवरुन प्रवास करत आहे.
आम आदमी पालक युनियनचे अध्यक्ष रॉबर्ट गौडर हे शुक्रवार १४ जुलैपासून सोलापूरहून निघाले आहेत. मंगळवारी ते पुणे येथे पोहोचणार आहेत. २१ जुलै रोजी ते मुंबईत पोहोचतील. तिथे ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजीत पवार यांना भेटणार आहे.
सध्या महाराष्ट्रात आरटीई कायद्यानुसार आर्थिक दुर्बल घटकातील मुलांसाठी २५ टक्के जागा राखीव ठेवल्या जातात. त्यानुसार आठवीपर्यंतचे शिक्षण हे फक्त आठवीपर्यंत आहे. आठवीनंतर आपल्या मुलांना खासगी शाळेत शिकविणे पालकांना आर्थिक अडचणीचे ठरते. यामुळे अनेक पालक मुलांची शाळा बदलतात किंवा शाळेतून काढून टाकतात. यामुळे या विद्यार्थ्यांचे भविष्य अंधकारमय झाले आहे.
सह्यांचे निवेदन मुख्यमंत्र्यांना देणारसोलापूर जिल्ह्यातील पालकांनी आरटीई अंतर्गत बारावी पर्यंतचे शिक्षण हे मोफत देण्याची विनंती केली आहे. त्यांच्या मागण्याचे निवेदन तयार केले असून यावर पालकांनी सह्या केल्या आहेत. यासोबतच शासनाने इंग्रजी माध्यमांच्या शाळा सुरु कराव्यात अशी मागणी करण्यात येणार आहे. यासाठीचे निवेदन मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांना देण्यात येणार आहे.