सोलापूर: मध्य रेल्वेने सुरू केलेली दादर-सातारा एक्स्प्रेस रेल्वेचे सांगोला रेल्वे स्टेशनवर आगमन होताच प्रवासी संघटनेकडून पेढे वाटून आनंद व्यक्त करण्यात आला. यावेळी पुरोगामी युवक संघटनेचे प्रदेशाध्यक्ष डॉ. बाबासाहेब देशमुख, प्रवासी संघटनेचे अध्यक्ष बाळासाहेब मस्के, शहीद अशोक कामटे संघटनेचे नीळकंठ शिंदे यांनी रेल्वेस पुष्पहार घालून स्वागत केले. यावेळी मान्यवरांनी मोटार मन आशिष कुमार व विश्वास कुमार, अशोक श्रीवास्तव, गार्ड बाळासाहेब ताकभाते यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला.
प्रायोगिक तत्त्वावर सुरू झालेली दादर-सातारा ही रेल्वे पंढरपूर, सांगोला मार्गे पुढे मिरज सातारापर्यंत आठवड्यातून रविवार, सोमवार व शुक्रवार असे तीन दिवस धावणार असल्याचे स्टेशन मास्तर गंगाकुमार सिंह यांनी सांगितले. यावेळी माजी उपनगराध्यक्ष अरुण बिले, उद्योजक अमर लोखंडे, गोपाळ चोथे, राजू मगर, प्रशांत मस्के, वसंतराव सुपेकर, संतोष पाटणे, ज्ञानेश्वर बनसोडे, आकाश व्हटे, विनायक मस्के, दत्तात्रय वाघमारे उपस्थित होते.