दहिगाव उपसा सिंचन योजनेसाठी उजवी व डावी अशी मिळून एकूण १७ चारीच्या माध्यमातून पाणी दिले जाते. त्यापैकी सध्या २ चारींना पाणी देणे बाकी आहे. कुंभेज येथील ४ पैकी १ पंप नादुरुस्त असल्यामुळे व इतर तांत्रिक बिघाडामुळे आवर्तन टेलला पोहोचण्यासाठी उशीर होत आहे. येत्या १५ दिवसांत सर्वांना पाणी मिळेल. त्यामुळे पाण्याच्या बाबतीत कुणीही शंका उपस्थित न करता यंत्रणेला सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले.
दहिगाव उपसा सिंचन योजनेमध्ये सालसे आणि आळसुंदे या गावांचा समावेश आहे. योजना सुरू झाल्यापासून या गावांना अद्याप पाणी मिळालेले नव्हते. सर्वप्रथम २०२० साली आ. शिंदे यांच्या पुढाकारातून या दोन्ही गावांना प्रथमच पाणी मिळाले. चालू आवर्तनाचे पाणी अद्याप या गावांना मिळणे बाकी आहे. ५ एप्रिलपासून या दोन गावांना पाणी सुरू आहे. परंतु, तांत्रिक बिघाडामुळे योजना काही दिवस बंद होती. त्यामुळे प्रत्यक्षात आम्हाला ११ एप्रिलपासून पाणी सुरू झाले आहे. सध्या इतर गावे वंचित आहेत, अशी ओरड सुरू आहे ती चुकीची आहे. आमची गावे ही वंचितच आहेत. फक्त आम्ही त्याचे राजकीय भांडवल करत नाही. आमची मागणी दहिगावच्या अधिकाऱ्यांकडे केलेली असून त्यानुसार आम्हाला पाणी सुरू आहेत, अशी माहिती मकाई सहकारी साखर कारखान्याचे माजी संचालक दशरथ घाडगे यांनी दिली.