शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे नवे मुख्यमंत्री कोण? सस्पेन्स अजून कायम; १ किंवा २ डिसेंबरला शपथविधी होणार
2
निवडून येतात तेव्हा गपगार, पराभवानंतर EVM ला दाेष; काेर्टाने याचिकाकर्त्यांना फटकारलं
3
कुजबुज! एका छताखाली कोणता झेंडा हाती?; पराभूत उमेदवार आता देवदर्शन करणार
4
प्रत्येक निवडणुकीनंतर EVM विरोधात घोंघावणारे हे वादळ कायमस्वरूपी शमविण्याची गरज
5
...तर महाराष्ट्रात खळबळ उडेल; उद्धव - राज यांनी एकत्र येण्याला आणखी कुठला मुहूर्त हवा?
6
गुजरात ते मुंबई प्रवासात हत्येचा थरार?; तीन वर्षांनी हत्येचा गुन्हा, तपास सुरू
7
...तोपर्यंत कांजूर डम्पिंग बंद करणे अशक्य; मुंबई महापालिका पर्यायी जागेच्या शोधात
8
पश्चिम रेल्वेवर वाढणार एसी लोकलच्या १३ फेऱ्या; वातानुकूलित फेऱ्यांची संख्या ९६ वरून १०९
9
इन्फ्लुएंझामुळे मुंबईकर ‘आजारी’, राज्यात ५७ रुग्णांचा मृत्यू; काय आहेत लक्षणे?
10
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
11
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
12
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
13
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
14
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
15
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
16
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
17
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
18
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
19
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
20
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले

सोलापूर स्मार्ट सिटीतील दररोजचा पाणीपुरवठा होणार बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 13, 2018 2:11 PM

हिप्परग्याची पातळी खालावली: उन्हामुळे वाढली पाण्याची मागणी

ठळक मुद्दे स्मार्ट सिटी अंतर्गत शहराला (एबीडी एरिया) दररोज पाणीपुरवठा करण्याचे प्रस्तावितहिप्परग्याची पातळी घटल्यामुळे बदल करणे अपरिहार्य असल्याचे अधिकाºयांनी सांगितले

सोलापूर : स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत एबीडी एरियात (जुने गावठाण) दररोज पाणीपुरवठा करण्याच्या प्रकल्पांतर्गत गोलचावडी व नवीपेठ भागात आॅगस्टपासून करण्यात येत असलेल्या दररोज पाणीपुरवठ्यावर गंडांतर येणार आहे. हिप्परग्याची पातळी घटल्यामुळे बदल करणे अपरिहार्य असल्याचे अधिकाºयांनी सांगितले. 

 स्मार्ट सिटी अंतर्गत शहराला (एबीडी एरिया) दररोज पाणीपुरवठा करण्याचे प्रस्तावित आहे.  त्याप्रमाणे गावठाण हद्दीतील भागात दररोज पाणीपुरवठा करण्यासाठी नियोजन करण्यात येत आहे. त्याप्रमाणे प्रायोगिक तत्त्वावर दोन भागात दररोज पाणीपुरवठा करण्याचे नियोजन करण्यात आले. त्यामध्ये दयानंद कॉलेज पाण्याच्या टाकीवरून जुनी गोलचावडी परिसर, जोडभावी पेठ, मंगळवार बाजार परिसर, कुंभार वेस, काशीकापडे गल्ली, चाटी गल्ली, गोल व बोरामणी तालीम, वडार गल्ली परिसरातील काही भागांचा समावेश आहे.  

दुसरा भाग उजनी जलवाहिनीवरून निवडण्यात आला आहे. पाकणी जलशुद्धीकरण केंद्रातून कोंडी एमबीआर ते शहरातील पाण्याच्या टाक्यांना जलवाहिन्या जोडण्यात आल्या आहेत. कोंडी एमबीआरवरून येणाºया जलवाहिनीला जुना पुणे नाका येथे एक दुसरी जलवाहिनी जोडलेली आहे. या जलवाहिनीवरून शिवशक्ती हॉटेल परिसर, दक्षिण व उत्तर कसबा, नवीपेठ, पत्रा तालीमच्या भागापर्यंत दररोज पाणीपुरवठा करण्याचे नियोजन करण्यात आले. त्याप्रमाणे ८ आॅगस्टपासून या भागात दररोज अर्धा तास पाणी देण्यात येत आहे.

गेल्या महिनाभरात विजेचा व्यत्यय, औज बंधारा कोरडा, जलवाहिनीत बिघाड यामुळे शहरातील पाणीपुरवठा विस्कळीत झाला आहे.  या काळात दररोजच्या पाणीपुरवठ्याच्या प्रयोगावरही परिणाम झाला. गेल्या एक महिन्यापासून उन्हाचा कडाका वाढला आहे व पाणी वितरणाचे दिवस वाढले आहेत. यामुळे पाण्याची मागणी वाढली आहे. त्यामुळे पाणी वितरणाचे नियोजन करणे जड जात आहे. --------------

  • - हिप्परगा तलावाची पातळी खालावली आहे. दुबार पंपिंगद्वारे आता दररोज केवळ १ एमएलडी (दशलक्ष लिटर) पाणी उपलब्ध होत आहे. पाणी गिरणीची क्षमता २२.५ एमएलडी इतकी आहे. त्यामुळे कमी पडणारे पाणी उजनी जलवाहिनीवरून घेण्यात येत आहे. उजनी जलवाहिनीवरील व्हॉल्व्ह बदलल्यानंतर वाढलेले पाणी या नियोजनात जात आहे. त्यामुळे आता लवकरच दररोजचा पाणीपुरवठा बंद करावा लागणार अशी चिन्हे आहेत.

--------------दोन दिवसाआड अशक्य- आयुक्त डॉ.अविनाश ढाकणे यांनी जलवाहिन्याचे जोड पूर्ण झाल्यावर व अमृतमधील कामे पूर्ण झाल्यावर पाणी वाढणार असे सांगितले होते. यातून डिसेंबरनंतर दोन दिवसाआड पाणीपुरवठा करण्याचे सुतोवाच त्यांनी केले होते. पण आता निर्माण झालेली परिस्थिती पाहता तीन दिवसाआड शहराला पाणीपुरवठा होणे अशक्य झाले आहे. त्यामुळे दोन दिवसाआडच्या प्रयोगाबाबत साशंकता व्यक्त होत आहे.  

टॅग्स :SolapurसोलापूरSolapur Municipalसोलापूर महानगरपालिकाWaterपाणीSmart Cityस्मार्ट सिटी