सोलापूर : शाळा, महाविद्यालयातील तरुणी, महिलांवर होणारे अत्याचार, छेडछाडीसारखे प्रकार रोखण्यासाठी सोलापूर शहर पोलीस आयुक्तालयाच्यावतीने आता पोलिस ठाणेनिहाय आता नव्याने स्वतंत्र महिला पोलीसांचे दामिनी पथक स्थापन करण्यात आले आहे. शहरात ८ पोलीस ठाणे असून प्रत्येकी ठाण्यास दोन याप्रमाणे १३ दामिनी पोलीसांची निवड करण्यात आली आहे.
दरम्यान, शाळा, महाविद्यालयात रोडरोमिओंकडून होणाºया छेडछाडीसंदर्भातील घटनांवर आळा घालण्यासाठी सोलापूर शहरातील सलगर वस्ती पोलीस ठाणे, औद्योगिक पोलीस स्टेशन, आय़टी़आय़पोलीस स्टेशन, जोडभावी पेठ पोलीस स्टेशन, सदर बझार पोलीस स्टेशन, फौजदार चावडी पोलीस स्टेशन, जेलरोड पोलीस स्टेशन, एमआयडीसी अशा आठ पोलीस स्टेशननिहाय प्रत्येकी दोन अशा १३ दामिनी पोलीसांचे पथक तयार करण्यात आले आहे.
नागरिकांनी दामिनी पथकातील महिला पोलिसांना गैरकृत्य करणाºयांची माहिती दिल्यास काही वेळातच ते पथक आपल्याला मदत करणार आहे. आपल्या परिसरात काही संशयित तरुण, चोरटे फिरत असतील तर त्याचीही माहिती द्यावी पथकाला देणे नागरिकांचे कर्तव्य आहे़ याशिवाय दामिनी पथकाकडून प्रत्येक महाविद्यालयात तरूणींचे समुपदेश व मार्गदर्शन करणारे व्याख्याने आयोजित करण्यात येत असल्याचे शहर पोलीस आयुक्तालयाने सांगितले.
------------------------------या आहेत पोलीस ठाणेनिहाय दामिनी पथकातील प्रमुख
- सलगर वस्ती पोलीस ठाणे : ज्योती शेरखाने, निलाबाई इमडे
- औद्योगिक पोलीस स्टेशन : स्वाती भोसले, भाग्यश्री केदार
- आयटीआय पोलीस स्टेशन : अंजली दहिहंडे, मिनाक्षी नारंगकर
- जोडभावी पेठ पोलीस स्टेशन : रूपा माशाळ
- सदर बझार पोलीस स्टेशन : शरावती काटे
- फौजदार चावडी पोलीस स्टेशन : भाग्यश्री गुंड, रत्ना सोनवणे
- जेलरोड पोलीस स्टेशन : संगिता डोळस, अर्चना जमादार
- एमआयडी पोलीस स्टेशन : गंगा खोबरे
-----------------------------विद्यार्थिनींना भेटून जाणून घेणार अडचणी- सबंधित पोलिस ठाण्यातील दामिनी पथक त्यांच्या हद्दीत असलेल्या शाळा, कॉलेज, होस्टेल, कोचिंग क्लास आदी ठिकाणी विद्यार्थिनींशी संवाद साधणार आहेत. प्रत्येक शाळा, महाविद्यालयात व्हिजीट बुक ठेवण्यात आले आहे़ संबंधित पथक त्या महाविद्यालयात गेल्यावर किती वाजता पथक आले याबाबतचा तपशिल ठेवण्यात येणार आहे़ शिवाय महाविद्यालयात तक्रारी पेटी ठेवण्यात आली आहे़ महाविद्यालयातील तरूणींच्या अडचणी, प्रश्न दामिनी पथकाकडून जाणून घेण्यात येणार आहेत. विद्यार्थिनींची काही तक्रार असल्यास ती सोडवण्यासाठी दामिनी पथक मदत करणार आहे. विद्यार्थिनींना त्रास देणाºया रोडरोमिओंचा बंदोबस्त करण्याची जबाबदारी दामिनी पथकावर सोपवण्यात आल्याची माहिती शहर पोलीस आयुक्तालयाने दिली आहे़
------------------------शहरात मंगळसुत्र चोरी, महिलांवरील होणारे अत्याचार, शाळा, महाविद्यालयात रोडरोमिंयोकडून होणारा त्रास यावर दामिनी पथकाच्या माध्यमातून आळा बसेल, अशी आशा आहे. आता महिलांनी एक पाऊल पुढे टाकत आपल्या शाळा, कॉलेज, खासगी शिकवणी, सार्वजनिक ठिकाणे, बाजारपेठा, सोसायट्या, कॉलन्यांमध्ये काही समस्या असल्यास ती माहिती देण्याची जबाबदारी आहे. तरच अप्रिय घटनांना आळा बसेल.- अभय डोंगरे,सहा़ पोलीस आयुक्त, सोलापूर शहर