शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवार, उद्धव ठाकरेंचे राजकारण संपले? दोघांनाही आहे अजून एकेक संधी...
2
IPL Auction 2025: कृणाल पांड्या, नितीश राणासाठी RR vs RCB मध्ये रंगला 'रॉयल' सामना! कुणाचा झाला फायदा?
3
आदित्य ठाकरेंच्या नावाचा आग्रह केला पण...; विरोधी पक्षनेते पदावर भास्कर जाधव काय म्हणाले?
4
IPL Auction 2025 : मुंबईकर अजिंक्य, पृथ्वी अन् शार्दुलसह या स्टार खेळाडूंना अनसोल्डचा टॅग
5
म्युच्युअल फंडात गुंतवणूक करता का? काय आहेत समज, गैरसमज; जाणून घेऊ सर्व प्रश्नांची उत्तरं
6
राष्ट्रवादीचे नेते दिलीप वळसे पाटील शरद पवारांच्या भेटीला; कारणही आलं समोर
7
प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा दिल्याच्या चर्चांवर नाना पटोलेंनी सोडलं मौन; म्हणाले...
8
देवेंद्र फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री होणार? मनोज जरांगे पाटील स्पष्टच बोलले; म्हणाले...
9
उद्धव ठाकरे यांनी आदित्य ठाकरे आणि सुनील प्रभूंवर सोपवली मोठी जबाबदारी, या पदांवर केली नियुक्ती 
10
पुन्हा पक्षफुटीची भीती? उद्धव ठाकरेंची खास रणनीती, नव्या २० आमदारांना शपथबद्ध करणार!
11
जिओची धमाकेदार ऑफर, 50 दिवसांपर्यंत मिळेल सुपरफास्ट इंटरनेट!
12
Animal चा समाजावर वाईट परिणाम; रणबीर कपूर म्हणाला, "मलाही तुमचं मान्य आहे..."
13
"अजित पवार यांना मुख्यमंत्री, तर मला मंत्री करा’’, राष्ट्रवादीच्या आमदाराने व्यक्त केली इच्छा
14
थोरातांच्या पराभवानंतर सत्यजित तांबे अजित पवारांच्या भेटीला; म्हणाले, "त्यांच्यासारखा माणूस..."
15
"बिहार खड्ड्यात गेलाय’’, पोटनिवडणुकीतील पराभवानंतर प्रशांत किशोर यांची प्रतिक्रिया 
16
पेन्शनधारकांनो, नो टेन्शन; हयातीचा दाखला मिळणार घरपोच!
17
IND vs AUS :आम्ही दबावात होतो; पण... बुमराहनं शेअर कमबॅक मागची स्टोरी
18
IPL Auction 2025: "थोडे जास्तच पैसे गेले, आम्ही रिषभ पंतसाठी..."; LSGच्या मालकांनी सांगितला 'फसलेला' प्लॅन
19
Gold Silver Price Today : सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; पटापट चेक करा दिल्ली ते कोलकात्यापर्यंतचे दर
20
"कुटुंबात 4 जण, मतं मिळाली फक्त 2", 'तो' व्हिडीओ शेअर करत अभिनेत्यानं EVM वर घेतला संशय

माढा विधानसभा मतदारसंघात आघाडीला धोक्याची घंटा

By admin | Published: May 23, 2014 1:14 AM

राष्टÑवादीला ७० तर महायुतीला ६३ गावात आघाडी

 

 कुर्डूवाडी : लोकसभा निवडणुकीच्या निकालाद्वारे माढा विधानसभा मतदारसंघातून मतदारांनी राष्टÑवादी काँग्रेससमोर धोक्याची घंटाच वाजवली आहे. या विधानसभा मतदारसंघातील १३३ गावांपैकी ७० गावातून राष्टÑवादीला आघाडी दिली तर ६३ गावातून महायुतीला आघाडी मिळाली. यामुळे येणार्‍या विधानसभा निवडणुकीत सत्ताधार्‍यांना बरीच कसरत करावी लागणार असल्याचे निकालावरुन दिसून येत आहे. माढा तालुक्यात विशेषत: विधानसभा मतदार संघात राष्टÑवादी काँग्रेसचे सर्वच संस्थांवर एकमुखी वर्चस्व आहे. विशेष म्हणजे लोकसभा निवडणुकीत राष्टÑवादीसह काँग्रेस, शेकाप या प्रमुख पक्षांचे आमदार, माजी आमदार यांच्यासह अनेक पदाधिकार्‍यांनी उमेदवार विजयसिंह मोहिते-पाटील यांच्यासाठी जीवाचे रान केले होते. त्या तुलनेत महायुतीचे सदाभाऊ खोत यांच्याकडे प्रचारासाठी यंत्रसामग्री कमी व कार्यकर्त्यांचाही वानवा दिसून आला. मात्र त्यांनी दिलेली चिवट लढत ही राष्टÑवादीसारख्या पक्षासाठी बरीच ओढाताण करावी लागली. मोहिते-पाटील यांच्यासाठी आमदार बबनराव शिंदे, माजी आमदार धनाजी साठे, भाई एस. एम. पाटील, सभापती रणजितसिंह शिंदे, जि. प. अध्यक्षा डॉ. निशिगंधा माळी, समाज कल्याणचे सभापती शिवाजी कांबळे, भैरवनाथ शुगरचे उपाध्यक्ष शिवाजीराव सावंत, उपसभापती बंडू ढवळे आदी मातवरांनी तर खोत यांच्यासाठी प्रदेश सचिव संजय पाटील-घाटणेकर, शिवसेना जिल्हाप्रमुख धनंजय डिकोळे, कुर्डूवाडीचे उपनगराध्यक्ष व रिपाइंचे बापूसाहेब जगताप, भाजपाचे तालुकाध्यक्ष विनायक भगत, विनायक उबाळे आदींनी प्रचाराची धुरा सांभाळली. महायुतीच्या नेत्यांनी आपल्या गावातून मताधिक्य दिले मात्र जि. प. अध्यक्षा माळीसह अनेकांना आपल्या गावातून राष्टÑवादीला मताधिक्य देता आले नाही. त्यामुळे राष्टÑवादीला आत्मचिंतन करण्याची वेळ आली आहे. राष्टÑवादीकडून उमेदवारीसाठी इच्छुक असलेले संजय शिंदे हे निवडणुकीपासून अलिप्त होते. सापटणे (टें), अरण, महाळुंग, वाघोली, उंबरे, जांबुड, बोरगाव आदी गावातून राष्ट्रवादीला मोठी आघाडी मिळाली तर मोडनिंब, लऊळ, उंदरगाव, घाटणे, भोसरे, मानेगाव, तुळशी, कुर्डू, पिंपळनेर, केवड आदी गावातून महायुतीला आघाडी मिळाली आहे. विधानसभा मतदार संघातून मोहिते-पाटील यांना अखेरच्या टप्प्यातील मतमोजणीत १४ हजार २२५ मतांची मिळालेली आघाडी ही त्यांच्या विजयासाठी महत्त्वाची ठरली. सदाभाऊ खोत यांची चिवट लढत ४माढा तालुक्यात विशेषत: विधानसभा मतदारसंघात राष्टÑवादी काँग्रेसचे सर्वच संस्थांवर एकमुखी वर्चस्व आहे. विशेष म्हणजे लोकसभा निवडणुकीत राष्टÑवादीसह काँग्रेस, शेकाप या प्रमुख पक्षांचे आमदार, माजी आमदार यांच्यासह अनेक पदाधिकार्‍यांनी उमेदवार विजयसिंह मोहिते-पाटील यांच्यासाठी जीवाचे रान केले होते. त्या तुलनेत महायुतीचे सदाभाऊ खोत यांच्याकडे प्रचारासाठी यंत्रसामग्री कमी व कार्यकर्त्यांचीही वानवा दिसून आली; मात्र त्यांनी चिवट लढत दिली.