पहिल्या लाटेत एखादा रुग्ण सापडले की, तत्काळ त्यांच्या संपर्कातील लोकांना क्वारंटाईन करून तपासणी केले जात होती. ते आता होताना दिसत नाही. सध्या लॉकडाऊनचा अंदाज घेऊन मुंबई, पुणे, बंगलोर अशा मोठ-मोठ्या शहरांमधून स्थलांतरित लोकांचा लोंढा मूळगावी परत येत आहेत. त्यांचीही तत्काळ तपासणी होण्याची मागणी होऊ लागली आहे.
-----
श्रीशैलहून परतलेल्या भाविकांची तपासणी करा
काही दिवसांपूर्वी अक्कलकोट तालुक्यातून श्रीशैलला श्री मल्लिकार्जुन यात्रेनिमित्त हजारो भाविक गेलेले होते. ते सर्वजण मूळगावी परत आलेले आहेत. त्यामधून बरेचजण कोरोना पॉझिटिव्ह निघत आहेत. गावपातळीवर महिती संकलन करून तपासणी होणे गरजेचे आहे. अन्यथा तालुक्यात मोठ्या प्रमाणात फैलाव होण्याची शक्यता नाकारता येत नाही, अशी चिंता नागरिकांमधून होऊ लागली आहे.
२० एप्रिल रोजी १३० जणांचे तपासणी झाली असून, त्यापैकी १६ जण पॉझिटिव्ह आले आहेत. दोन दिवसांत अक्कलकोट शहरातून १८ जण ग्रामीणमधून १९ असे ३७ जण कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामध्ये श्रीशैल यात्रेसाठी जाऊन आलेल्यांची संख्या अधिक आहे.
-----
दुसऱ्या लाटेत ग्रामपंचायत, नगरपालिका व आरोग्य विभाग अशा प्रत्येकांनी आपापल्या स्तरावर कोरोना संशयित रुग्ण व त्याच्या संपर्कातील लोकांची तपासणी करायची आहे. त्या पद्धतीने विभागणी करून दिली आहे. त्यानुसार कामकाज सुरू आहे. हे काम आणखी गतीने होण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.
- डॉ. अश्विन करजखेडे, तालुका आरोग्य अधिकारी