अक्कलकोट तालुक्यात कमी वजनाची १ हजार १०८ बालके आहेत. अंगणवाडीमार्फत विविध सेवा देऊन बालकांचे वजन, उंची वाढविण्यावर भर देण्यात येत आहे. प्रत्येक महिन्याला बालकांचे वजन, उंची घेण्यात येते. प्रत्येक बालकास पोषण आहार देत, त्यांच्या पालकांनाही मार्गदर्शन करण्यात येत आहे. तरीही, काही बालकांचे वजन वाढत नाही. बालके कुपोषित राहतात. अशा बालकांकडे अतिरिक्त लक्ष देण्यासाठी दत्तक बालक श्रेणीवर्धन योजना सुरू करण्यात आली आहे.
गावातील प्रतिष्ठित व्यक्ती, पंचायतराजमधील सदस्य, गावातील शासकीय कर्मचारी, शिक्षकांनी कुपोषित बालके दत्तक घेऊन त्यांना सुदृढ करण्याचे आवाहन सीईओ दिलीप स्वामी यांनी केले होते. त्या आवाहनाला चांगला प्रतिसाद मिळत आहे. या योजनेत एकूण १ हजार १०८ बालकांचा समावेश असून, आतापर्यंत २५३ बालकांना सुदृढ बनविण्यात आल्याचे बालविकास प्रकल्प अधिकारी बालाजी आल्लडवाड यांनी सांगितले.
..............
दत्तक बालक श्रेणीवर्धन योजनेंतर्गत दानशूर लोकांकडून बालकांसाठी मदत केली जात आहे. तालुक्यातील दानशूर व्यक्तींच्या मदतीने योजनेत साधारण अडीच लाख रुपये बालकांवर खर्च करण्यात आले आहे. दानशूर व्यक्तींनी आपल्या भागातील अंगणवाडीमधील एखादे तरी बालक दत्तक घेऊन त्याचे श्रेणीवर्धन करण्यासाठी मदत करावी.
- बालाजी आल्लडवाड, बालविकास प्रकल्प अधिकारी, अक्कलकोट
.........
फोटोओळ :
घोळसगाव (ता. अक्कलकोट) येथील अंगणवाडीत बालकांना सुकामेवावाटप करताना दानशूर व्यक्ती, अंगणवाडीसेविका, मदतनीस.
(फोटो २५अक्कलकोट)