पंढरीचा पांडुरंग म्हणजेच श्रीहरी विठ्ठल हा साक्षात श्रीकृष्णाचा अवतार आहे. रंगपंचमी उत्सव हा श्रीकृष्णाचा आवडता सण असल्याने पंढरपूरमध्ये रंगपंचमी उत्साही वातावरणात साजरी करण्यात आली. वसंत पंचमीला विठ्ठलाचा विवाह सोहळा संपन्न झाला. तो झाल्यावर देवाला म्हणजेच श्री विठ्ठलाला पांढरा पोशाख घातला जातो. वसंत ऋतू सुरू होतो. या ऋतूमध्ये पांढरा पोशाख परिधान केला म्हणजे उन्हाचा आणि थंडीचा त्रास होत नाही. हा पांढरा पोशाख रंगपंचमीपर्यंत असतो.
रंगपंचमीनिमित्त दुपारी ३ वाजता विठूरायाला पांढरा शुभ्र पोशाख आणि रुक्मिणीमातेस पांढरी साडी परिधान करण्यात आली. त्यानंतर पुन्हा एकदा केशरी, गुलाल, बुक्का असे नैसर्गिक रंग लावण्यात आले. याचबरोबर बडवे, उत्पात यांचेदेखील डफ मिरवणूक परंपरेप्रमाणे निघाले. डफाची मिरवणूक सुरू झाली किंवा डफ वाजला की रंगपंचमी संपली असा एक अलिखित नियम आहे. असे असले तरी या रंगोत्सवात शेकडो वर्षांपासून असलेली परंपरा आणि रंगात न्हाऊन निघालेला श्रीरंग म्हणजेच सावळ्या विठुरायाचे लोभस रूप डोळ्यात साठवून भाविक तृप्त होतात.
फोटो लाईन :::::::::::::::::
०२पंड०१
रंगपंचमीनिमित्त श्री विठ्ठलाची पूजा करताना कार्यकारी अधिकारी विठ्ठल जोशी, व्यवस्थापक बालाजी पुदलवाड.
०२पंड०२
रंगपंचमीनिमित्त श्री विठ्ठलाच्या डफाची मिरवणूक काढताना मंदिर समितीचे कर्मचारी.