यंदा लॉकडाऊनमुळे आठ महिन्यांपासून स्वामी समर्थांचे मंदिर दर्शनाकरिता बंद होते. ते आता दिवाळी पाडव्याच्या मुहूर्तावर सुरू झाले. या पार्श्वभूमीवर दत्तजयंती व नूतन वर्ष स्वागतानिमित्त स्वामी भक्तांची दर्शनाकरिता गर्दी वाढण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे मंदिरात भाविकांचा सामूहिक संपर्क टाळण्याकरिता प्रशासनाच्या सूचनेनुसार जयंतीनिमित्त आयोजित करण्यात येणारे भजन, कीर्तन व दुसऱ्या दिवशी सायंकाळी ५ ते रात्री १० यावेळेत अक्कलकोट शहरातून निघणारा पालखी सोहळा आदी सर्व धार्मिक कार्यक्रम रद्द केले आहेत. केवळ श्री दत्त जन्मसोहळा होईल. यावेळी कोणत्याही भाविकांचा सहभाग असणार नाही. तसेच ३१ डिसेंबर व १ जानेवारी रोजी अनुक्रमे सरत्या वर्षाला निरोप व नूतन वर्षाचे स्वागत समारंभ वटवृक्ष मंदिरात कोल्हापूर, मुंबई येथील स्वामी भक्त व भजनी मंडळाच्या वतीने विविध धार्मिक कार्यक्रम होतात. यावेळी फटाक्यांची आतषबाजी केली जाते, परंतु यंदा हे धार्मिक कार्यक्रम ही रद्द केले आहेत, याची स्वामी भक्तांनी नोंद घ्यावी, असे आवाहन महेश इंगळे यांनी केले आहे.
स्वामी समर्थ मंदिरातील दत्तजयंती उत्सवाचे कार्यक्रम रद्द
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 25, 2020 4:18 AM