करमाळा : वडील घरात सतत त्रास देऊन आईला मारहाण करीत असल्याने या प्रकारास वैतागून दोन मुलांनी मिळून स्वत:च्या वडिलांचा खून केला. पुरावा नष्ट करण्यासाठी अंत्यविधीही उरकला होता. घटनेचा तपास करून करमाळा पोलिसांनी खरे आरोपी समोर आणले आहेत.
७ एप्रिल रोजी रात्री १०.३० वाजण्याच्या सुमारास आई अविदा हिस वडील मृत भैरु हे मारहाण करीत होते. यावेळी संशयित निखील जगताप व अक्षय जगताप (दोघेही रा. वरकुटे, ता.करमाळा) यांनी संगनमत करून भैरु भागवत जगताप (५५, रा.वरकुटे-मुर्तीचे, ता. करमाळा) यांना थांबविण्याचा प्रयत्न केला. तेव्हा निखील व अक्षय या दोघांनी वडिलास जबरदस्तीने पकडून त्यांचे दोरीने पाय बांधले. त्यानंतर दोरीचा फास आवळून जीवे मारल्याचे तपासात उघडकीस आले आहे.