डीसीसी बँकेचे प्रशासक शैलेश कोथमिरे यांनी प्रशासकपदाचा पदभार घेतल्यापासून डीसीसी बँकेला गतवैभव प्राप्त करून देण्याचा प्रयत्न सुरू ठेवला आहे. शेतकऱ्यांना थेट कर्जपुरवठ्याबरोबर व्यापाऱ्यांना कर्जपुरवठा करण्याचे धोरण निश्चित केल्याने व्यावसायिकांना आर्थिक दिलासा मिळत आहे. सुशिक्षित बेरोजगारांकडे एखाद्या व्यवसायाचे कौशल्य आहे; परंतु भांडवलाअभावी ते व्यवसाय करू शकत नाहीत. अशा गरजू लाभार्थींसाठी डीसीसीची कर्जपुरवठा योजना आधार ठरली आहे.
या योजनेंतर्गत मंगळवेढा येथील एका फर्निचर व्यावसायिकाला ३४ लाख रुपये कर्जपुरवठा केला आहे. सदर वाटपाचा धनादेश प्रशासक शैलेश कोथमिरे यांच्या हस्ते देण्यात आला. यावेळी दुकानाचे मालक रियाझ शेख, आबासाहेब भडांगे, पालक अधिकारी शब्बीर मुजावर, वरिष्ठ बँक निरीक्षक भीमाशंकर सोमगोंडे, बँक निरीक्षक बजरंग राजमाने, शाखाधिकारी महेश इंगोले, सचिव दिलीपकुमार सावंत, संजय पवार, सिद्धेश्वर पाटील उपस्थित होते.
फोटो ओळी ::::::::::::::::::::::
मंगळवेढा येथील व्यापाऱ्याला धनादेश सुपुर्द करताना प्रशासक शैलेश कोथमिरे, शब्बीर मुजावर, भीमाशंकर सोमगोंडे, बजरंग राजमाने आदी.