अक्कलकोट : गोगाव (ता.अक्कलकोट) येथून १४ वर्षीय बेपत्ता मुलीचा मृतदेह दोन दिवसानंतर गावाजवळील विहिरीत आढळला. तिचा मृतदेह आढळून पाच उलटल्यानंतरही तिच्या मृत्यूमागच्या कारणांचा उलगडा अद्याप झालेला नाही. इकडे पोलीस मात्र शवविच्छेदन अहवालाच्या प्रतीक्षेत असून, या अहवालानंतर तपासाची चक्रे वेगाने फिरणार आहेत.
नववीमध्ये शिकणारी स्नेहा अरविंद दीक्षित ५ फेब्रुवारी राेजी सकाळपासून मोबाइलवर खेळत होती. दुपारी १२नंतर ती परिसरातील दिसेनाशी झाली. नातेवाइकांनी तिचा शेाध घेतला. ती कुठेच आढळून आली नाही. रात्री ११ वाजता तिच्या वडिलांनी अक्कलकोट उत्तर पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार नोंदवली. पोलिसांनी त्याच रात्रीत गोगाव परिसरात तलाव, विहीरीजवळ शोधाशोध केली. ती आढळून आली नाही. त्यानंतर तीन दिवसांनी अर्थात रविवारी दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास गावाजवळील पाटील यांच्या विहिरीत तिचा मृतदेह आढळून आला. नतोवाइकांनी तत्काळ पोलिसांशी संपर्क साधून याची माहिती दिली. त्यांनी मृतदेह बाहेर काढून अक्कलकोट येथील ग्रामीण रुग्णालयात पाठविला. डॉ. जी. ए. मारकड, डॉ. निखिल क्षीरसागर, डॉ. शिवलीला माळी, डॉ. साधना पाटील या चार जणांच्या पथकांनी शवविच्छेदन केले. त्याचा अहवान अद्याप प्राप्त झालेला नाही.
उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. संतोष गायकवाड, पोलीस निरीक्षक के. एस. पुजारी, सहायक पोलीस निरीक्षक व्ही. के. नाळे, हवालदार अंगद गिते, हवालदार सुरवसे, राठोड यांनी घटनास्थळी भेट दिली.
---
चार वैद्यकीय तज्ज्ञांच्या पथकाने शवविच्छेदन केले आहे. तिच्या शरीराचे अवयव हे पुणे येथील प्रयोगशाळेत पाठवण्यात आले आहेत. याचा अहवाल येण्यासाठी किमान महिनाभराचा कालावधी लागतो. त्यानंतरच खरे कारण पुढे येईल. हा अहवाल येताच तो तत्काळ पोलिसांकडे सोपवू.
डॉ. जी. ए. मारकड
वैद्यकीय अधिकारी
---
धटनेनंतर पोलिसांचे पथक तत्काळ घटनास्थळी पोहोचले. या अहवालादरम्यान प्रकरणाचा छडा लावण्याचा प्रयत्न आहे. प्रथमदर्शनी घातपात नसल्याचे दिसून आले आहे. नातेवाईकांचीही चौकशी सुरु आहे.
- व्ही. के. नाळे
सहायक पोलीस निरीक्षक