चिंचगाव टेकडी येथील माळरानावर सन १९६५च्या दरम्यान प.पू. रामानंद सरस्वती महाराजांचे आगमन झाले होते. या ठिकाणीच त्यांनी एक छोटेसे महादेव मंदिर उभे केले. आज या ठिकाणी महादेवाचे मोठे मंदिर, भक्त निवास आहे. येथेच महाराजांचा मोठा सत्संग आश्रमही आहे.
या उजाड माळरानाला प.पू. रामानंद सरस्वती महाराज यांनी आपल्या कर्तृत्वाची झालर घालून नयनरम्य व आध्यात्मिक क्षेत्र म्हणून तालुक्यात नावारूपास आणलेले आहे. महाराजांनी या टेकडीचा मोठ्या प्रमाणात विकास करून माढा तालुक्यातील सर्वात मोठे देवस्थान व एक पर्यटनस्थळ म्हणून नावारूपास आणलेले आहे. त्यांच्यावर मंगळवारी दुपारी बारा ते एकच्या दरम्यान अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याचे सत्संग आश्रमाकडून सांगण्यात आले आहे.
...............
फोटो - प.पू. रामानंद सरस्वती महाराज
..........................
130921\img-20210913-wa0412.jpg
प पू रामानंद सरस्वती महाराज फोटो