राजकुमार सारोळे
सोलापूर : कोरोना विषाणूच्या संसर्गाने मृत्यू होण्याचा ग्रामीणचा दर २.३५ टक्के इतका असून, बार्शी तालुक्यातून गुरुवारी एकदम आठ मृतांची नोंद घेण्यात आल्याने मृत्यूदराचा टक्का एकदम वाढला आहे. तसेच ज्येष्ठांच्या मृत्यूचे प्रमाण हायपर टेन्शनने अधिक असल्याचे स्पष्ट झाले आहे.
ग्रामीण भागात २९ लाख १८ हजार लोक राहत असून, आतापर्यंत २४६१ रुग्ण पॉझिटिव्ह आढळले़. यामधील ५७ जणांचा मृत्यू झाला़ पॉझिटिव्ह आढळलेल्यांमध्ये १५०१ पुरुष (६२ टक्के), ९२० महिला (३८ टक्के) असे प्रमाण आहे. यात लक्षणे असलेले ११८ जण तर नसलेले २३०३ जण पॉझिटिव्ह आढळले आहेत. वयानुसार लागण झाल्याचे प्रमाण तपासल्यास ० ते १५ वर्षांपर्यंत: २३१, १६ ते ५० वर्षे : १५२०, ५१ ते ५९ वर्षे: ३४४, ६० वर्षांपुढील: ३२६ केसेस आहेत. संसर्ग वाढत जाईल तसे मृत्यूचे प्रमाण वाढल्याचे दिसून येते. दररोज दोघांचा मृत्यू झाल्याचे या महिन्यात चित्र दिसत आहे. २३ जुलै अखेर ३९ मृत्यूची नोंद झाली आहे.
ही आहेत कारणे
- मधूमेह : २१
- हायपर टेन्शन : २१
- किडनी : ५
- हृदयविकार : ५
- कॅन्सर : १
- प्रतिकारशक्ती कमी : १
- पॅरालिसिस : २
वयानुसार मृत्यूचे प्रमाण
- १ ते १० : १
- ११ ते २०: ०
- २१ ते ३०: १
- ३१ ते ४०: २
- ४१ ते ५०: १०
- ५१ वरील: ४३
असा झाला संसर्ग
- परराज्यात प्रवास: ३
- परदेश प्रवास: ३
- हॉस्पिटल संपर्क: १३
- मुंबई, पुणे रिटन: २७
- रेड झोन: ५५
- संपर्क: २३२०