सोलापूर : दोन पोलिसांच्या मारहाणीत मरण पावलेला ट्रॅक्टर चालक राजाभाऊ उर्फ प्रदीप कल्याण कुटे (वय-२४ रा. सोनगिरी, ता. भूम) याची, सोलापूर येथील शासकीय रूग्णालयात कॅमेºयाच्या निगराणीखाली तब्बल सहा तास शवविच्छेदन करण्यात आले.
राजाभाऊ कुटे याचा मृतदेह पहाटे ५.३0 वाजता शासकीय रूग्णालयात आणण्यात आला. माढा येथील न्यायालयाची परवानगी घेऊन दुपारी १.३0 वाजता शवविच्छेदनाला सुरूवात झाली. शवविच्छेदन करण्यासाठी डॉक्टरांची टिम शवागृहात दाखल झाली. शरीराच्या प्रत्येक भागाचे विशेष तज्ञ डॉक्टरांचा या टिममध्ये समावेश होता.
डॉक्टरांनी सर्व पोलीस व नातेवाईकांना बाहेर काढुन कॅमेºयाच्या निगराणीखाली शवविच्छेदन करण्यास सुरूवात केली. रात्री ७.३0 वाजेपर्यंत शवविच्छेदन सुरूच होते. राजाभाऊ कुटे याच्या मृतदेहासोबत त्याचा मामा गणेश धस व दोन मित्र होते. माढ्याचे पोलीस उपाधिक्षक पाटील, पोलीस निरीक्षक निकम, पोलीस कर्मचारी उपस्थित होते.
सोगिरीत पत्नीसह आई-वडीलांचा तब्बल ३0 तास आक्रोश...
- - ६ नोव्हेंबर रोजी दुपारी तुर्कपिंपरी येथील साखर कारखान्याकडे ऊस घेऊन जात असताना केवळ ट्रॅक्टरच्या टेपचा आवाज मोठा का ठेवला म्हणुन खाली उतरवुन माढा तालुक्यातील मानेगाव आऊटपोस्ट येथे दोन पोलिसांनी जबर मारहाण केली. मारहाणीत राजाभाऊ ऊर्फ प्रदीप कल्याण कुटे याचा मृत्यु झाला. चौकीत नेऊन डोळ्यासमोर आईने मुलाला आणि पत्नीने पतीला पोलिसांनी बेदम मारहाण केली.
- मारहाण करताना दोघीजणी दयेची भीक मागत होते, मात्र या मारहाणीत राजाभाऊ कुटे याचा जीव गेला. राजाभाऊ कुटे हा जागेवरच गेल्याचे लक्षात येताच दोन्ही पोलिसांनी हॉस्पिटल येथे नेले. तेथुन दोन्ही पोलीस पळुन गेले. रविवारी दुपारी १.३0 वाजल्यापासुन सोमवारी रात्री उशीरापर्यंत आई व पत्नीचा आक्रोश सुरू होता. तीन महिन्यापुर्वीच राजाभाऊ कुटे याचा विवाह झाला होता. चौथ्या महिन्यात पोलिसांच्या मारहाणीत त्याला जीव गमवावा लागला.