गेल्या १० वर्षांपासून दोड्याळे गटाची सत्ता आहे. संगीता बन्ने, विश्वनाथ दोड्याळे यांनी प्रत्येकी पाच वर्षं सरपंच पद भोगले आहे. यंदा गाव बिनविरोध करण्यासाठी दोन्ही गटाचे व ग्रामस्थांचे ही एकमत झाले. श्री रेवणसिद्ध सर्वधर्मसमभाव ग्रामविकास आघाडी पॅनलकडून दोड्याळे, बन्ने, नदाफ, पारशेट्टी, पाठणशेट्टी यांना तर अंकलगे, कोरे, नदाफ, दोड्याळे यांचे ग्रामविकास असे दोन पॅनल तयार केले. काही झाले तरी यावेळी गाव बिनविरोध करायचे त्यावरून सकारात्मक चर्चा झाली. त्यामध्ये पाहिले अडीच वर्षे सरपंच पद घेणा-या गटाला तीन जागा द्यायच्या तर दुसऱ्या टप्प्यात सरपंच पद घेणा-या गटाला जागा द्यायच्या असे चर्चेअंती ठरले. त्यानंतर या सर्व सदस्यांचा सत्कार तालुक्यातील कोणत्या नेत्याकडून करायचा, या मुद्द्यावर चर्चा झाली. त्यामध्ये एका गटाने काँग्रेसच्या नेत्यांकडून तर दुसऱ्या गटाने भाजपच्या नेत्यांकडून सत्कार स्वीकारायचा, असा आग्रह धरल्याने चर्चा फिस्कटली. केवळ या सत्काराच्या मुद्यावर एकमत न झाल्याने शेवटच्या दिवशी दोन्ही गटातील सदस्यांनी अर्ज दाखल केले आणि अखेर चुरशीने निवडणूक लागली.
ग्रामपंचायत : चपळगाववाडी
एकूण मतदार ८३६,
सदस्य संख्या ७, नवीन आरक्षणानुसार ४ महिला तर ३ पुरुष
लढत : दुरंगी