सोलापूर : सोलापूर विद्यापीठाच्या नामविस्तार सोहळ््यात सहकारमंत्री सुभाष देशमुख यांचे भाषण सुरू झाल्यानंतर धनगर समाजातील काही कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी केली. यामुळे काही काळ व्यत्यय आला तरी तरीही देशमुखांनी आपले भाषण सुरूच ठेवले. सोलापूर विद्यापीठाचे ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ’, असा नामविस्तार करण्यात आला आहे. विद्यापीठाच्या प्रांगणात बुधवारी नामविस्तार सोहळ््याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. सहकारमंत्री सुभाष देशमुख, दुग्धविकासमंत्री महादेव जानकर, जलसंपदामंत्री राम शिंदे, कुलगुरू डॉ. मृणालिनी फडणवीस, महात्मा फुले आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष राजा सरवदे, महापौर शोभा बनशेट्टी, आमदार नारायण पाटील यांच्यासह विविध मान्यवरांच्या उपस्थितीत हा सोहळा सुरू झाला.
सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी भाषणाला सुरूवात करताना ‘येळकोट येळकोट जय मल्हार’ अशी घोषणा दिली. ‘तुम्ही शासनाला साधे पत्रही दिले नाही. पाठिंबा मागायला आलो असता नकार दिला, असा आरोपही काही कार्यकत्यार्नी केला. मात्र देशमुखांनी आपले भाषण सुरूच ठेवले़. यावेळी सुभाष देशमुख म्हणाले की, सर्वानी मिळून प्रयत्न केल्यामुळे विद्यापीठाला पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर यांचे नाव मिळाले़. आहिल्यादेवी होळकर यांचे विचार समाजातील प्रत्येक घटकांपर्यंत पोहचविण्याची खरी असल्याचे मतही देशमुख यांनी व्यक्त केले़