चौकट
संकलनात ५० टक्क्यांची घट
केगाव, करमाळा व टेंभुर्णी या केंद्राचे संकलन प्रशासकीय मंडळाच्या कालावधीत ५० टक्क्यांनी घटले आहे. ० विविध खासगी दूध संघाचे जाळे ग्रामीण भागात वाढत आहे. वाड्या- वस्त्यांवर सोलापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाने अगोदर घालून दिलेल्या पायवाटेमुळे खासगी संघाला पोहोचणे सोपे झाले आहे. गावोगावी असलेल्या दूध डेअऱ्या खासगी दूध संघाला दूध पुरवठा करीत आहेत.
---
शीतकरण केंद्र / २ मार्च संकलन/ १३ ऑगस्ट संकलन केगाव १४१०३/ ६५५१ मोहोळ ७७८९| ७०४७ करमाळा ५१३९| २६६५ टेंभुर्णी ३६५२| १८६९ पंढरपूर ९८७९| ७२८७ सांगोला ३६२०| २९३१ मंगळवेढा ४७६२| ४३७३ एकूण ४७८४४| ३१५३७
---
शेतकऱ्यांना दुधाचे पैसे वेळेवर मिळत नसल्याची अडचण आहे. यासाठी मुंबई येथील जागा विक्री करणे हाच मार्ग आहे. जागा विक्रीसाठी परवानगी मिळण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. -श्रीनिवास पांढरे, अध्यक्ष, प्रशासकीय मंडळ
----