शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election 2024: जातीय दुभंगाला सोयाबीनचा तडक! मराठवाड्यातील लढतींचा लक्ष्यवेध
2
Maharashtra Election 2024: शेवटचा ‘मास्टर स्ट्रोक’! ‘सुपर संडे’साठी काँग्रेस अन् भाजप नेत्यांचा विदर्भात तळ
3
आजचे राशीभविष्य - १७ नोव्हेंबर २०२४, आर्थिक लाभाचा़ दिवस, घरात शांतता व आनंदाचे वातावरण राहील
4
प्रचाराच्या आसमंतात हेलिकॉप्टरची भिरभिर; निवडणुकीच्या हंगामात होणार ५५० कोटींची उलाढाल
5
तोंडातून उसळे शब्दांचे हे बाण, वेडात प्रचारी वीर दौडले सात...
6
Savner Assembly Election 2024: सख्ख्या भावांच्या लढतीत वहिनी मारणार का बाजी?
7
महाराष्ट्रातील आठ लाख नोकऱ्या गुजरातला गेल्या; प्रियांका गांधींचा महायुतीवर हल्ला
8
मणिूपरच्या जिरिबाममध्ये तिघांचे मृतदेह सापडल्याने प्रचंड तणाव; मंत्र्यांच्या घरासमोर निदर्शने
9
भारत-चीनमधील तणाव कमी होणे आवश्यक; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांचे मत
10
...म्हणूनच ‘बटेंगे तो कटेंगे’ची घोषणा; केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांची भूमिका
11
बहिणींना पैसे देताय, पण त्यांच्या सुरक्षेचे काय?, शरद पवार यांचा सरकारला सवाल
12
एक तरी आयकॉनिक प्रोजेक्ट दाखवा; देवेंद्र फडणवीस यांचे ठाकरेंना आव्हान
13
अमेरिकेतील सरकारी नोकऱ्यांमध्ये होणार कपात, रामास्वामींकडून संकेत
14
काँग्रेसने प्रसिद्ध केला मुंबईकरांसाठी स्वतंत्र जाहीरनामा; हाउसिंग सोसायट्यांना ६ महिन्यांत देणार ओसी
15
बनावट शस्त्र, परवाना रॅकेटचा अहिल्यानगर पोलिसांकडून पर्दाफाश; जम्मू काश्मिरमध्ये नऊ जणांना अटक
16
मतांच्या ढिगाऱ्यात चंगू, मंगू बुडाले पाहिजे; मुख्यमंत्री शिंदे यांची राऊत बंधूंवर टीका
17
मुंबईत तब्बल आठ हजार किलो चांदीचे घबाड केले जप्त; निवडणूक आयोगाची कारवाई
18
"लोकसभेत गुडघ्यावर आणले, आता महायुतीस पाताळात गाडणार"; उद्धव ठाकरेंचा इशारा
19
"मला हलक्यात घेतलं, त्याचे परिणाम आता दिसतायत"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राऊतांना इशारा
20
"केंद्र बिंदूच्या बुडाला आग लावायची वेळ आली"; उद्धव ठाकरेंचा ठाण्यातून महायुतीवर घणाघात

सोलापूर जिल्ह्याच्या दूध संकलनात ४४ हजार लिटरची घट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 28, 2019 10:54 AM

दुष्काळाचा फटका; दूध संघाचे संकलन आले एक लाख लिटरच्या खाली

ठळक मुद्देसोलापूर जिल्ह्याचे संकलन मागील वर्षीच्या तुलनेत यावर्षीच्या मे महिन्यात ४४ हजार लिटरने घटलेमागील वर्षी मे महिन्यात सहकारी व खासगी संघांचे प्रति दिन दूध संकलन १२ लाख ८६ हजार २१८ लिटर इतके होत होतेखासगी संघांचा दूध खरेदी दर प्रति लिटर २८-२९ रुपयांवर गेल्याने शेतकºयांनी खासगी संघाला दूध घालण्यास सुरुवात

सोलापूर: दुष्काळाचा फटका बसल्याने सोलापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक सहकारी संघाचे दूध संकलन प्रथमच एक लाख लिटरच्या आत आले आहे. दुष्काळी परिस्थितीमुळे जिल्ह्याचे दूध संकलन मागील वर्षीच्या तुलनेत ४४ हजार लिटरने कमी झाले असल्याचे जिल्हा दुग्धविकास कार्यालयाकडून सांगण्यात आले. 

यावर्षी पाण्याअभावी जनावरांच्या वैरणीवर परिणाम झाला आहे. मार्चनंतर सगळीकडेच वैरणची चणचण भासू लागली आहे. शेतकºयांकडे असलेला चारा संपल्याने चारा छावण्या सुरू करण्याची मागणी पुढे आली. छावण्या सुरू होण्यास उशीर झाल्याने जनावरांची उपासमार सुरू झाली. याचाच फटका दूध संकलनाला बसला आहे. 

छावण्या सुरू झाल्यानंतर सांगोला, मंगळवेढा, माढा तालुक्यातील दूध संकलनात होणारी घट थांबली. मात्र अन्य तालुक्यांतील दूध संकलनावर परिणाम झाला आहे. 

सोलापूर जिल्हा सहकारी दूध संघाचे संकलन प्रथमच एक लाख लिटरच्या आत आले आहे. दूध संघाचे संकलन प्रति दिन ९७ हजार लिटरवर आले आहे. मागील वर्षभर प्रति दिन दीड लाख व एक लाख १५ हजार लिटरच्या दरम्यान दूध संकलन होत होते. ते यावर्षी मे व जून महिन्यात कमी होत गेले. 

सोलापूर जिल्ह्याचे संकलन मागील वर्षीच्या तुलनेत यावर्षीच्या मे महिन्यात ४४ हजार लिटरने घटले आहे. मागील वर्षी मे महिन्यात सहकारी व खासगी संघांचे प्रति दिन दूध संकलन १२ लाख ८६ हजार २१८ लिटर इतके होत होते. यावर्षी १२ लाख ४२ हजार १४० लिटर इतके झाले आहे. 

सोलापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ(दूधपंढरी)चे संकलन यापूर्वी एक लाखापेक्षा कमी कधीही झाले नव्हते. मात्र यावर्षी फटका बसला आहे. खासगी संघांचा दूध खरेदी दर प्रति लिटर २८-२९ रुपयांवर गेल्याने शेतकºयांनी खासगी संघाला दूध घालण्यास सुरुवात केल्याचाही फटका दूधपंढरीला बसला असल्याचे सांगण्यात आले. 

माढा तालुक्याला सर्वाधिक फटका - मे २०१८ व मे २०१९ ची तफावत पाहिली असता माढा तालुक्यात सर्वाधिक प्रतिदिन १८ हजार लिटर दूध संकलन घटल्याची आकडेवारी जिल्हा दुग्ध विकास कार्यालयाची आहे. पंढरपूर तालुक्याचे प्रतिदिन १० हजार लिटर तर मोहोळ तालुक्याचे आठ हजार लिटर दूध संकलन कमी झाले आहे. मंगळवेढा तालुक्याचे सहा हजार तर करमाळा तालुक्याचे पाच हजार लिटर दूध संकलन कमी झाले आहे. सांगोल्याचे चार हजार लिटर तर बार्शी तालुक्याचे दोन हजार लिटर दूध संकलन घटले असल्याची आकडेवारी आहे.

टॅग्स :SolapurसोलापूरMilk Supplyदूध पुरवठाFarmerशेतकरीagricultureशेतीdroughtदुष्काळ