ऑक्सिजनअभावी अनेक कोरोना रुग्णांचे हाल झाले, तर काहींना जीवही गमवावा लागला. स्थानिक रुग्णांच्या नातेवाइकांना ऑक्सिजन मिळविण्यासाठी धावपळ करावी लागली होती. सध्या कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता वैद्यकीय क्षेत्रातून व्यक्त करण्यात येत आहे. संभाव्य तिसऱ्या लाटेचा धोका ओळखून अकलूजच्या उपजिल्हा रुग्णालयातील रुग्णांना ऑक्सिजनची कमतरता भासू नये, यासाठी आ. रणजितसिंह मोहिते-पाटील यांनी आमदार निधीतून उपजिल्हा रुग्णालयास १३ ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर मशीन उपलब्ध केले आहेत. त्याचे आज आ. रणजितसिंह मोहिते-पाटील यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले. याप्रसंगी वैद्यकीय अधीक्षक डॉ. श्रेणिक शहा, डॉ. संतोष खडतरे, डॉ. मुकुंद जामदार, डॉ. मनीषा कदम, डॉ. सुप्रिया खडतरे, डॉ. निखिल मिसाळ आदींची उपस्थिती होती.
कोट :::::::::::::::::
अकलूज उपजिल्हा रुग्णालयात सर्वसामान्य नागरिक उपचार घेत असतात. त्यांची आर्थिक परिस्थिती बेताची असते. कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेचा धोका व ऑक्सिजनची गरज ओळखून आ. रणजितसिंह मोहिते-पाटील यांनी आमदार फंडातून दिलेल्या ऑक्सिजन काॅन्सन्ट्रेटर मशीनचा सर्वसामान्य रुग्णांना लाभ होईल.
- डाॅ. श्रेणिक शहा
वैद्यकीय अधीक्षक, उपजिल्हा रुग्णालय, अकलूज