आनंदनगर जि.प. शाळेत सुरू केलेल्या कोविड सेंटरसाठी डॉ. बाळकृष्ण गायकवाड, डॉ. हर्षवर्धन गायकवाड, डॉ. प्रदीप जगदाळे, डॉ. नामदेव गायकवाड, डॉ. उमेश अनपट, डॉ. नितीन कुबेर, डॉ. प्रफुल्ल गायकवाड, डॉ. प्रमोद गायकवाड, डॉ. अप्पा टेळे मोफत सेवा देणार आहेत. या सीसीसी सेंटरमध्ये कोविड रुग्णांसाठी ऑक्सिजन, औषधांची सोय, फॅनबरोबर मनोरंजनासाठी टीव्ही आदी सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. सौम्य लक्षणे असणाऱ्या रुग्णांना मोफत आयुर्वेदिक, होमिओपॅथिक औषधोपचार, आयुर्वेदिक आहारविहार, घरगुती प्राणायम, योगासने, रुग्णांची कोविड टेस्ट केली जाणार आहे. रक्त तपासणीही द्वारकाधीश सेवाभावी संस्थेच्या माध्यमातून सवलतीत उपलब्ध केल्याचे डॉ. हर्षवर्धन गायकवाड यांनी सांगितले.
यावेळी तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. रामचंद्र मोहिते, उपसरपंच वसंतराव गायकवाड, नामदेव गायकवाड, द्वारकाधीश सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष ऋषीकेश गायकवाड, मुख्याध्यापक संतोष कोले, मुख्याध्यापक तात्यासाहेब कुंभार, संजय शिंदे, ग्रा.पं. चे सदस्य राजेंद्र सोनवणे, संजय जगदाळे, संस्थेचे सदस्य बाळासाहेब शिंदे, ग्रामविकास अधिकारी सुजाता भोसले, तलाठी सुषमा यादव, पोलीस पाटील सुनील म्हैत्रे, वैद्यकीय अधिकारी डॉ. अर्चना माने, प्रमोद पानसरे, काकासाहेब जाधव, महाकू नायकुडे, उद्धव खंदारे आदी उपस्थित होते.