करकंब : ग्रामपंचायतीचे सहकार्य व लोकवर्गणीतून उभारलेल्या जय हनुमान तालीमचा लोकार्पण सोहळा जिल्हा परिषद सदस्य रणजितसिंह शिंदे यांच्या हस्ते पार पडला.
यावेळी श्रीराम मंदिर- स्टेट बँक रस्त्याचे काँक्रिटीकरण कामाचा शुभारंभ यावेळी करण्यात आला. १५ वा वित्त आयोग, दलित वस्ती, नागरी सुविधा, शाळा दुरुस्ती, भूमिगत गटार, शाळा सुशोभीकरण, अंगणवाडी सुशोभीकरण, अंतर्गत रस्ते अशा अनेक कामांमध्ये आमदार बबनराव शिंदे यांचे सहकार्य लाभले अन् करकंबच्या विकासात भर पडल्याचे मत जिल्हा परिषद सदस्य रणजितसिंह शिंदे यांनी व्यक्त केले.
कार्यक्रमास करकंबचे उपसरपंच आदिनाथ देशमुख, रावसाहेब मगर, पोपट चव्हाण, नात्याबा मोहिते, ॲड. शरदचंद्र पांढरे, राहुल शिंगटे, सुनील मोहिते, विवेक शिंगटे, रघुनाथ जाधव, विजय शिंगटे, अमोल शेळके, सावता खारे, शंकर राऊत, सुभाष गुळमे, ग्रामविकास अधिकारी डॉ. सतीश चव्हाण उपस्थित होते.
-------
फोटो : ०७ करकंब
करकंब येथील तालीमचे लोकार्पण करताना रणजितसिंह शिंदे, आदिनाथ देशमुख, रावसाहेब मगर, पोपट चव्हाण, नात्याबा मोहिते, ॲड. शरदचंद्र पांढरे.