अशा घोषणा देऊन त्यांना अखेरचा निरोप दिला. यावेळी गंगथडे कुटुंबीयांसह ग्रामस्थांना अश्रू अनावर झाले होते.
नायब तहसीलदार किशोर बडवे, सहायक जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी बाळासाहेब पाटील, सरपंच नंदादेवी वाघमारे यांच्या हस्ते राष्ट्रध्वज पत्नी वैशाली गंगथडे, मातोश्री रतन ग॔ंगथडे यांच्याकडे सुपूर्द केला. त्यांच्या पश्चात आई, पत्नी, दोन मुले, भावजय, पुतणे असा परिवार आहे.
यावेळी पोलीस उपनिरीक्षक बी. एस. माने, उपसरपंच राजेंद्र खंडागळे, पायनर युनिटचे सुभेदार टी. आर. भोसले, हवालदार मुकेश कुमार, लान्स नायक टी. व्ही. राव, कल्याण संघटक संजीव काशीद, माजी सैनिक कल्याणकारी संघटना सांगोला कॅप्टन रावसाहेब साळुंखे, सुभेदार बी. एच. निमंग्रे, अविनाश पवार, नायब सुभेदार विलास माळी, वाॅरंट ऑफिसर माजी सैनिक उत्तम चौगुले, मंडलाधिकारी बाळासो कदम, तलाठी नारायण खरात, ग्रामसेविका अर्चना केंदुळे, पोलीस पाटील जगदीश वाघमारे, आजी-माजी सैनिक, पोलीस कर्मचारी, ग्रामपंचायत सदस्य आदींनी पुष्पचक्र वाहून श्रद्धांजली वाहिली.
संगेवाडी येथील दीपक गंगथडे हे सन २००० सालापासून १८०२ पायनर युनिट भोपाळ येथे सैन्यदलात भरती झाले होते. गेल्या दोन वर्षांपासून त्यांना मेंदूचा विकार झाल्याने पुणे येथील कमांड हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केले होते. दरम्यान, २१ ऑगस्ट रोजी सायंकाळी ७.३० वाजता त्यांचे निधन झाले. निधनाची माहिती सोलापूर जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय व नातेवाइकांना दिली. सोमवारी त्यांचे तिरंग्यामध्ये लपेटलेले पार्थिव पुण्यातून संगेवाडी गावात आणून ग्रामपंचायत कार्यालयासमोर अंतिम दर्शनासाठी ठेवले. यावेळी उपस्थित मान्यवरांनी त्यांना पुष्पचक्र वाहून श्रद्धांजली अर्पण केली. त्यानंतर त्यांच्या शेतात मुलगा श्रवण व वेदांत या दोघांनी त्यांना मुखाग्नी दिला. यावेळी उपस्थितांनी ‘नाईक दीपक गंगथडे अमर रहे.. अमर रहे..’ अशा घोषणा दिल्या.
फोटो ओळ ::::::::::::::::
संगेवाडी येथील पायनर युनिटचे नायक दीपक गंगथडे यांच्या पार्थिवाला मुलगा श्रवण व वेदांत यांनी मुखाग्नी दिला. यावेळी उपस्थित जनसमुदाय.