करमाळा : नगर परिषद आयोजित किचन गार्डनिंग स्पर्धेत दीपाली जयंत कोष्टी आणि प्रल्हाद काशिनाथ साळवे यांना विभागून तर पर्यावरणपूरक घर स्पर्धेमध्ये चक्रधर विश्वनाथ पाटील यांनी प्रथम क्रमांकाचे पारितोषिक पटकावले.
दीपाली कोष्टी या अहमदनगर प्राथमिक प्राथमिक शाळेत शिक्षिका असून त्यांनी स्वत:च्या घराच्या छतावर विविध फळे, फुले, पालेभाज्या, आयुर्वेदिक वनस्पती, शोभेची झाडे लावलेली आहेत. त्यांनी आपली नोकरी सांभाळत करमाळा नगर परिषदेने केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत ओला कचरा, सुका कचरा, धोकादायक कचरा वेगवेगळा करून कंपोस्ट खत व गांडूळ खताची निर्मिती केली आहे.
नगराध्यक्ष वैभव जगताप, मुख्याधिकारी वीणा पवार, नगरसेवक, नगर परिषदेच्या कर्मचाऱ्यांनी या स्पर्धेचे कौतुक केले.
---
यांना मिळाले पुरस्कार....
* किचन गार्डनिंग आणि होममेड कंपोस्ट खत स्पर्धा : प्रथम क्रमांक : दीपाली कोष्टी, प्रल्हाद साळवे.
द्वितीय क्रमांक : सीमा जाधव, तेजस्विनी झालटे. तृतीय क्रमांक : माया भागवत, माधुरी साखरे.
* पर्यावरणपूरक घर स्पर्धा :
प्रथम क्रमांक : चक्रधर पाटील.
द्वितीय क्रमांक : सतीश शिगची. तृतीय क्रमांक : मनीषा बाभळे.
उत्तेजनार्थ विभागून यशोदा परदेशी
---
फोटो : २० करमाळा
करमाळा नगर परिषदेच्या वतीने किचन गार्डनिंग स्पर्धेत प्रथम क्रमांकाचे पारितोषिक स्वीकारताना दीपाली कोष्टी.