शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांना मी आमदार केलं असं म्हणणार नाही, कारण त्यावेळी मी तिसरीत होतो: अजित पवार
2
"शिवसेनेत बसलेल्या सासूमध्ये प्रॉब्लेम"; शेवटच्या सभेत राज ठाकरेंचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल
3
मणिपूरबाबत केंद्राचा मोठा निर्णय; सीएपीएफच्या ५० तुकड्या पाठविणार
4
दिल्लीमध्ये पुन्हा शेतकरी आंदोलन पेटणार, हजारो ट्रॅक्टर कूच करणार, उपोषणाचीही घोषणा
5
बुलढाण्यात शिवसेना उमेदवाराला पाठिंबा दिल्याचं पत्र खोटं; राष्ट्रवादी काँग्रेसनं दिलं स्पष्टीकरण
6
रूकेगा नहीं... इस्रायलचे लेबनानवर हल्ले सुरूच, हिज्बुल्लाच्या मुख्य प्रवक्त्याचा केला खात्मा
7
ईडी-सीबीआयच्या दबावाखाली पक्ष बदलला नाही - कैलाश गेहलोत
8
175 किमीची रेंज देणारी 'ही' इलेक्ट्रिक बाईक, किंमत 90 हजारांपेक्षा कमी
9
Numerology: ‘या’ ५ मूलांकांवर दत्तकृपा; गुरुपुष्यामृत योगावर अपार लाभ, लक्ष्मी शुभच करेल!
10
₹२२० प्रीमिअमवर पोहोचला 'हा' IPO, लिस्टिंगवर होऊ शकतो ९८ टक्क्यांचा नफा; कधी करता येईल गुंतवणूक?
11
Maharashtra Vidhan Sabha 2024: सर्वांत तरुण उमेदवार कोणत्या पक्षाचे?
12
Vastu Tips: आजारमुक्त वास्तु ठेवण्यासाठी फॉलो करा 'या' सोप्या वास्तुटिप्स!
13
भाजपा नेत्यांच्या या दहा घोषणांनी बदलली प्रचाराची दिशा, निकालात ठरू शकतात निर्णायक
14
भारतात गेलेलो तेव्हा डोक्यात किडा घुसला; अमेरिकेच्या नव्या आरोग्य मंत्र्यांचे वादग्रस्त वक्तव्य चर्चेत
15
"काँग्रेसची सत्ता असलेल्या कर्नाटकात सोयाबीनला केवळ ३,८०० रुपयांचा भाव’’; भाजपा खासदाराने दाखवला आरसा
16
एक Home Loan घेतल्यानंतर दुसरं होम लोन घेता येतं का? जाणून घ्या काय आहे दुसऱ्या लोनची प्रोसस
17
कैलाश गेहलोत भाजपमध्ये सामील, दिल्ली निवडणुकीपूर्वी अरविंद केजरीवालांना मोठा झटका
18
Gold Silver Rates Today : लग्नसराईच्या काळात सोन्या-चांदीच्या किंतीत मोठा बदल, स्वस्त झालं की महाग? पटापट चेक करा 14 ते 24 कॅरेट सोन्याचा लेटेस्ट रेट
19
विदेशी वित्तसंस्थांच्या विक्रीचा मारा थांबणार कधी? अमेरिकेची बेरोजगारी, जपानच्या चलनवाढीकडे लक्ष
20
Maharashtra Election 2024 Live Updates: आमच्या सरकारने जे सांगितले गेले ते केले आणि जे सांगितले गेले नाही तेही केले. - जे पी नड्डा

‘सिद्धेश्वर’च्या चिमणी पाडकामाची स्थगिती फेटाळली

By admin | Published: July 08, 2017 12:40 PM

.

आॅनलाइन लोकमत सोलापूरसोलापूर दि ८ : कुमठे येथील सिद्धेश्वर साखर कारखान्याच्या चिमणी पाडकामाला स्थगिती देण्याचा अर्ज वरिष्ठस्तर दिवाणी न्यायाधीश व्ही. पी. पाटील यांनी  फेटाळून लावला. याप्रकरणी कारखान्याचे भागधारक महादेव चाकोते यांनी कारखान्यातर्फे नव्याने बांधण्यात आलेली चिमणी पाडू नये व याबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी चिमणी पाडण्याचा दिलेला आदेश रद्द व्हावा म्हणून दिवाणी न्यायालयात अर्ज दाखल केला होता. यावर न्यायालयाने चिमणी पाडकामाला एकतर्फी तात्पुरती स्थगिती दिली होती. यावर न्यायालयात सुनावणी झाली. मनपातर्फे अ‍ॅड. नंदकुमार पाटील यांनी बाजू मांडताना शहर हद्दीतील सर्व नवीन बांधकामांना मनपाची पूर्वपरवानगी घेणे बंधनकारक असून बेकायदेशीर झालेले बांधकाम पाडण्याचा अधिकार असल्याचे नमूद केले. कारखान्याने चिमणी बांधताना मनपाची कोणतीही परवानगी घेतलेली नाही. त्यामुळे हे बेकायदेशीर बांधकाम पाडणे न्यायाच्या दृष्टीने योग्य होईल, असे मत मांडले. विमान प्राधिकरणातर्फे अ‍ॅड. सार्थक चिवरी यांनी विमानतळ क्षेत्रात असताना कारखान्याने कोणतीही परवानगी घेतली नाही. १७ फेब्रुवारी व १७ मे रोजी कारखान्याने केवळ वाढीव बांधकामाची माहिती प्राप्त केली आहे. प्रस्तावित चिमणी विमानसेवेला अडथळा ठरणारी आहे, यासंबंधीची कागदपत्रे न्यायालयास सादर केली. तसेच यापूर्वी कारखान्याने यासंबंधी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती, पण त्यात पाडकामाबाबत स्थगितीचे आदेश नाहीत. बेकायदेशीरपणे उभारण्यात आलेली चिमणी पाडणेच योग्य असल्याचे निदर्शनाला आणले. सरकारतर्फे अ‍ॅड. वामनराव कुलकर्णी यांनी युक्तिवाद करताना जिल्ह्यातील सर्व बेकायदेशीर बांधकाम पाडकामाचे अधिकार जिल्हाधिकाऱ्यांना आहेत. या अधिकारान्वये त्यांनी चिमणी पाडण्याची कारखान्याला रीतसर नोटीस दिलेली आहे. सोलापूर हे केंद्र सरकारच्या रिजनल कनेक्टिव्हिटी योजनेत समाविष्ट असून, सप्टेंबर २०१७ पासून विमानसेवा सुरू करण्याचे नियोजन आहे. यासाठी शासनाने मोठा खर्च केला आहे. याबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी वेळोवेळी बैठका घेऊन संबंधित कारखान्याला कळविले आहे. पण कारखान्याने चिमणी हलविण्याची दखल घेतली नाही.