वाळूज : मोहोळ तालुक्यात देगांव - कौठाळी हा निजामकालीन रस्ता होता. हा रस्ता सध्या वाहिवाटीत नसून शेतीसाठी वापरात आला आहे. काही ठिकाणी फक्त शिव रस्ता म्हणूनच राहिला आहे. पूर्वी तुळजापूर तालुका असताना या रस्त्याला जास्त महत्व होते. या रस्त्यावरील खड्डे आणि अतिक्रमण काढून तो पूर्ववत करावा अशी मागणी सर्वसामान्यांतून होत आहे.
या मार्गावरून तुळजापूरला कमी अंतरावर जोडले आहे. त्यामुळे हा रस्ता दुरूस्त करावा, अशी मागणी या परिसरातील शेतकऱ्यांतून होत आहे.
---
वाळूजमधील शेतकऱ्यांना पीक विम्याची रक्कम तोकडी
वाळूज : मोहोळ तालुक्यात देगाव, भैरेवाडी, मनगोळी येथील शेतकऱ्यांनी खरीप हंगामात सोयाबीन, तूर या पिकांचा विमा उतरविला होता. त्याची नुकसान भरपाई रक्कम काही शेतकऱ्यांना आली आहे तर काही शेतकऱ्यांना अद्याप मिळाली नाही.
ज्या शेतकऱ्यांना मिळाली आहे . ती रक्कम तुटपुंजी मिळाली आहे . विमा कंपनीने विमा उतरवलेल्या शेतकऱ्यांना समान रक्कम द्यावी अशी मागणी येथील शेतकऱ्यांनी केली आहे.
----
भोगावती - नागझरी नदीवर पुलाअभावी नागरिकांचे हाल
वाळूज : मोहोळ तालुक्यात वाळूज येथील भोगावती - नागझरी नदी संगमावर पुलाअभावी नागरिकांचे हाल होत आहेत. ही बऱ्याच वर्षापासून मागणी आहे. गावाचा निम्मा शिवार आणि दोनशे लोकवस्तीची जाधव वस्ती नदीच्या पलीकडे आहे. त्यामुळे नदीला पाणी आल्यास शेतकऱ्यांना पोहूनच कपडे भिजवत जावे लागते. नदी संगमावर पूल व्हावा अशी येथील शेतकऱ्यांची बऱ्याच वर्षापासूनची मागणी आहे.
----
अण्णाभाऊ साठे यांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार देण्याची मागणी
सोलापूर : लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांना मरणोत्तर ‘भारतरत्न पुरस्कार’ मिळावा यासाठी केंद्र सरकारला राज्य शासनाच्या वतीने शिफारस करण्यात यावी अशी मागणी मातंग समाजाच्या वतीने सामाजिक न्याय राज्यमंत्री डॉ. विश्वजीत कदम यांच्याकडे करण्यात आली. सुरेश पाटोळे यांच्या नेतृत्वाखाली एका शिष्टमंडळाने कदम यांची भेट घेऊन मागणीचे निवेदन देण्यात आले. यावेळी मंत्रालयातील दालनात बैठक पार पडली. तसेच क्रांतिवीर लहुजी साळवे स्मारकासाठी निधी उपलब्ध करून द्या, अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ अंतर्गत थेट कर्ज योजना अशा विविध मागण्यांवर यावेळी चर्चा करण्यात आली. या शिष्टमंडळात अण्णाभाऊ साठे महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक अ. को. अहिरे, सिद्धार्थ झाल्टे, देवराम मेश्राम, समाजकल्याण निरीक्षक मेघराज काते, विजय अंभोरे, मनोज कांबळे, ज्ञानेश्वर काळे सहभागी झाले होते.
----
फोटाे : ३१ सुरेश पाटोळे
विश्वजीत कदम यांना मागण्यांचे निवेदन सादर करताना सुरेश पाटोळे, अ. को. अहिरे