शिक्षण प्रसारक मंडळाचे सन २००८- २०२० या कालावधीतील चेअरमन, सचिव आणि जनता विद्यालयाचे मुख्याध्यापक या सर्वांनी मळून शिक्षण विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांचे आदेश डावलून १२ वर्षांपासून सागर भागवत राजगुरू यांना अनुकंपा तत्त्वावर शिपाई पदावर नियुक्त करणे टाळले. याबाबत विशेष पोलीस महानिरीक्षक यांचे आदेश आले. टेंभुर्णी पोलीस ठाण्यात १२ जानेवारी रोजी शिक्षण प्रसारक मंडळ, माजी चेअरमन पी. आर. सुतार, सुभाष मेथा, सुभाष चव्हाण, औदुंबर महामुनी, माजी सचिव संतोष पाटी, विद्यमान सचिव विलास राजमाने, जनता विद्यलयाचे माजी मुख्याध्यापक गंगाधर उबाळे, जवाहर मेथा, डी. के. देशमुख, एच. एम. तांबोळी, विद्यमान मुख्याध्यपक प्रमोद भोसले यांच्यावर ॲट्राॅसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
परंतु, आरोपींना अद्याप अटक करण्यात आलेली नाही.
गुन्हा दाखल होवूनदेखील राजकीय दबावामुळे पोलीस अटक करीत नसल्याचा आरोप या संघटनांमूधन होत आहे. सर्व आरोपींना तातडीने अटक करण्याची मागणी मागासवर्गीय संघटनांनी पोलीस अधीक्षक सोलापूर व विशेष पोलीस महानिरीक्षक नागरी हक्क संरक्षक (मुंबई) यांच्याकडे केली आहे. विशेष पोलीस महानिरीक्षक यांनी चौकशी करून गुन्हा दाखल करण्याचे आदेश देऊनही परत चौकशीच्या नावाखाली आरोपींना अटक केले जात नसल्याचे निवेदनात म्हटले आहे.
----
या प्रकरणाची चौकशी प्रलंबित आहे. चौकशी पूर्ण झाल्यानंतर योग्य ती कारवाई करण्यात येईल.
- डाॅ. विशाल हिरे
उपविभागीय पोलीस अधिकारी, करमाळा