शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवार, उद्धव ठाकरेंचे राजकारण संपले? दोघांनाही आहे अजून एकेक संधी...
2
IPL Auction 2025: कृणाल पांड्या, नितीश राणासाठी RR vs RCB मध्ये रंगला 'रॉयल' सामना! कुणाचा झाला फायदा?
3
आदित्य ठाकरेंच्या नावाचा आग्रह केला पण...; विरोधी पक्षनेते पदावर भास्कर जाधव काय म्हणाले?
4
IPL Auction 2025 : मुंबईकर अजिंक्य, पृथ्वी अन् शार्दुलसह या स्टार खेळाडूंना अनसोल्डचा टॅग
5
म्युच्युअल फंडात गुंतवणूक करता का? काय आहेत समज, गैरसमज; जाणून घेऊ सर्व प्रश्नांची उत्तरं
6
राष्ट्रवादीचे नेते दिलीप वळसे पाटील शरद पवारांच्या भेटीला; कारणही आलं समोर
7
प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा दिल्याच्या चर्चांवर नाना पटोलेंनी सोडलं मौन; म्हणाले...
8
देवेंद्र फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री होणार? मनोज जरांगे पाटील स्पष्टच बोलले; म्हणाले...
9
उद्धव ठाकरे यांनी आदित्य ठाकरे आणि सुनील प्रभूंवर सोपवली मोठी जबाबदारी, या पदांवर केली नियुक्ती 
10
पुन्हा पक्षफुटीची भीती? उद्धव ठाकरेंची खास रणनीती, नव्या २० आमदारांना शपथबद्ध करणार!
11
जिओची धमाकेदार ऑफर, 50 दिवसांपर्यंत मिळेल सुपरफास्ट इंटरनेट!
12
Animal चा समाजावर वाईट परिणाम; रणबीर कपूर म्हणाला, "मलाही तुमचं मान्य आहे..."
13
"अजित पवार यांना मुख्यमंत्री, तर मला मंत्री करा’’, राष्ट्रवादीच्या आमदाराने व्यक्त केली इच्छा
14
थोरातांच्या पराभवानंतर सत्यजित तांबे अजित पवारांच्या भेटीला; म्हणाले, "त्यांच्यासारखा माणूस..."
15
"बिहार खड्ड्यात गेलाय’’, पोटनिवडणुकीतील पराभवानंतर प्रशांत किशोर यांची प्रतिक्रिया 
16
पेन्शनधारकांनो, नो टेन्शन; हयातीचा दाखला मिळणार घरपोच!
17
IND vs AUS :आम्ही दबावात होतो; पण... बुमराहनं शेअर कमबॅक मागची स्टोरी
18
IPL Auction 2025: "थोडे जास्तच पैसे गेले, आम्ही रिषभ पंतसाठी..."; LSGच्या मालकांनी सांगितला 'फसलेला' प्लॅन
19
Gold Silver Price Today : सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; पटापट चेक करा दिल्ली ते कोलकात्यापर्यंतचे दर
20
"कुटुंबात 4 जण, मतं मिळाली फक्त 2", 'तो' व्हिडीओ शेअर करत अभिनेत्यानं EVM वर घेतला संशय

करमाळा अन् माढा तालुक्यातील केळीला उत्तर भारतात मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 26, 2020 3:45 PM

कोरोना संकटातही गूड न्यूज; रोज ५०० टन केळीची निर्यात, भाव मिळू लागला

ठळक मुद्देआंध्रप्रदेशातील केळीचा हंगाम संपला आहे. तेथील केळी उत्तर भारतात मोठ्या प्रमाणात पाठवली जातेआंध्रप्रदेशातील केळी संपल्याने त्याचा लाभ सोलापूर जिल्ह्यातील केळी पुरवठादारांना सध्या उजनी परिसरात निर्यातक्षम केळी उपलब्ध होत आहे. ती चवीला चांगली

नासीर कबीर  

करमाळा : केळी दरात मागील दोन-तीन दिवसांत चांगली सुधारणा झाली असून, करमाळा तालुक्यातील  दर्जेदार केळीला उत्तर भारतातून चांगला उठाव आहे. सध्या केळी दिल्ली, उत्तरप्रदेश, राजस्थान, जम्मू-काश्मीर  येथे मोठ्या प्रमाणात पाठवण्यात येत आहे.  यामुळे केळी बागायतदारांच्या चेहºयावर हसू फुुललं आहे.

कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊनमुळे  बाजारपेठा बंद होत्या. ग्राहक नव्हते शिवाय जिल्हा बंदीची सक्त अंमलबजावणीमुळे केळीची पाठवणूक  रखडली होती. यामुळे दरात घसरण झाल्याने केळी उत्पादक संकटात सापडला होता. २० एप्रिलपासून शेतीमालास लॉकडाऊनमधून सवलत मिळाल्याने केळीची पाठवणूक सुरू झाली आहे. टेंभुर्णी, कंदर, वाशिंबे, उमरड, शेटफळ, चिकलठाण, वांगी  भागातून सध्या रोज ५० ट्रक (एक ट्रक १० टन क्षमता)  म्हणजे दररोज ५००  टन केळीची उत्तरप्रदेश, दिल्ली, पंजाब, हरियाणा, जम्मू-काश्मीर येथे पाठवली जात आहे. केळीचे दर मागील आठवड्यात ४ ते ५ रुपये किलो होते, परंतु आज २५ तारखेपासून रमजान सुरू झाल्याने उत्तरेकडून केळीची मोठी मागणी सुरू झाली आहे. परिणामी दरात सुधारणा झाली असून, ७ ते ८ रुपये किलो दर शिवार खरेदीत मिळत आहेत. यामुळे केळी उत्पादकातून उत्साहाचे वातावरण पसरले आहे.

आंध्रातला हंगाम संपला.. सोलापूर जिल्ह्याला संधीआंध्रप्रदेशातील केळीचा हंगाम संपला आहे. तेथील केळी उत्तर भारतात मोठ्या प्रमाणात पाठवली जाते. आंध्रप्रदेशातील केळी संपल्याने त्याचा लाभ सोलापूर जिल्ह्यातील केळी पुरवठादारांना होत आहे. सध्या उजनी परिसरात निर्यातक्षम केळी उपलब्ध होत आहे. ती चवीला चांगली असल्याने त्यास मागणी आहे, अशी माहिती फलटणचे खरेदीदार सनी इंगळे यांनी ‘लोकमत’ला सांगितली.

टॅग्स :Solapurसोलापूरcorona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसAPMCपुणे कृषी उत्पन्न बाजार समितीAndhra Pradeshआंध्र प्रदेशfruitsफळे