मोडनिंब : राष्ट्रीय महामार्गावरील मोडनिंब येथील रेल्वे गेटजवळ होणार्या वाहतूक कोंडीमुळे वाहनचालक व प्रवासी वैतागले असून, उड्डाण पूल वाहतुकीसाठी खुला करण्याची मागणी सर्वपक्षीयांनी केली आहे. सहा महिन्यांपूर्वीच या उड्डाण पुलाचे काम पूर्ण झाले असून, केवळ रेल्वे विभागाच्या नाहरकतीअभावी वाहतुकीची समस्या वरचेवर वाढत चालली आहे.मोडनिंब येथील पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गाचे चौपदरीकरण झाल्याने येथील रेल्वे गेटवर उड्डाण पूल बांधण्यात आला आहे. त्याचे कामही पूर्ण झाले आहे. मात्र रेल्वे प्रशासन व संबंधित ठेकेदार यांच्यातील समेट अद्याप घडून न आल्याने टोल भरूनही तासंतास रहदारीत अडकावे लागत आहे.जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा डॉ. निशिगंधा माळी, रिपाइंचे पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष कुमार वाघमारे, सरपंच नवनाथ मोहिते, तालुका काँग्रेसचे अध्यक्ष शिवाजी पाटील, राष्ट्रवादीचे तालुका उपाध्यक्ष कैलास तोडकरी, माजी सरपंच नागनाथ ओहोळ, बाबुराव सुर्वे, सदाशिव पाटोळे, रोटरीचे अध्यक्ष डॉ. संतोष दळवी, माजी अध्यक्ष सुनील पुरवत, मनसेचे जिल्हाध्यक्ष प्रशांत गिड्डे यांनी उड्डाण पूल त्वरित सुरू करण्याची मागणी केली आहे.
उड्डाण पूल खुला करण्याची मागणी मोडनिंबकरांची मागणी; वाहतूक कोंडीमुळे वाहनचालक त्रस्त
By admin | Published: May 05, 2014 7:26 PM