बार्शी : आर.टी.ई. प्रवेशाची कोरोना महामारीमुळे मुदत वाढवाढ देण्याची मागणी सहजीवन संस्थेच्या वतीने करण्यात आली आहे. संस्थेचे अध्यक्ष बालाजी डोईफोडे यांच्या नेतृत्वाखाली शिष्ठमंडळाने नायब तहसीलदार संजीवन मुंढे यांची भेट घेऊन मागणीचे निवेदन दिले.
आर्थिकदृष्टया दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना शिक्षण हक्क कायद्याअंतर्गत (आर.टी.ई.) प्रवेश दिला जातो. परंतू सध्या कोरोनामुळे अनेक ठिकाणी जनता कर्फ्यू लागू आहे. स्थानिक प्रशासनाचे आदेश, वाढती रुग्णांची संख्या आणि ऑनलाईन प्रणालीच्या तांत्रिक अडचणी व बंद असणाऱ्या शाळांमुळे पालकांना ऑनलाईन फॉर्म भरणे अडचणीचे ठरत आहे. सध्या महाराष्ट्र राज्यामध्ये आर.टी.ई. ची प्रवेश संख्या ९६,६८१ आहेत मात्र १,७७,६३२ पालकांनी अर्ज केले आहेत. अर्ज करण्याची मुदत ३० मार्च पर्यंत आहे. वरील सर्व बाबींचा विचार करता, ऑनलाईन फॉर्म भरण्याची मुदत ३० एप्रिल पर्यंत वाढवावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
यावेळी सचिव ॲड. सुहास कांबळे, पालक अभिजित शिंदे, दत्ता पाटील, सागर केसरे, रवी चव्हाण, किशोर कांबळे उपस्थित होते.
---
२० बार्शी आरटीई
आरटीई प्रवेशाची मुदत वाढीची मागणी नायब तहसीलदार संजीवन मुंढे यांच्याकडे करताना बालाजी डोईफोडे आणि कार्यकर्ते