करमाळा : तालुक्यातील महसूल विभागातील रिक्त पदाची भरती करावी, अशी मागणी राष्ट्रवादी कॉग्रेसचे तालुका कार्याध्यक्ष हनुमंतराव मांढरे-पाटील यांनी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्याकडे लेखी निवेदनाव्दारे केली आहे.
करमाळा महसूल कार्यालयात नायब तहसीलदार, मंडल अधिकारी, अव्वल कारकून, तलाठी व लिपिक ही पदे रिक्त आहेत. यामुळे कार्यालयीन कामकाजावर परिणाम झाला आहे. करमाळा तालुक्याचे कार्यक्षेत्र विस्ताराने मोठे असून रिक्त पदाचा अतिरिक्त पदभार इतर अधिकाऱ्यांवर सोपवण्यात आला आहे. त्यामुळे लोकांची कामे वेळेवर होत नाहीत. एका कामासाठी कार्यालयात नागरिकांना वारंवार हेलपाटे मारावे लागत असल्याचे निवेदनात कार्याध्यक्ष मांडरे-पाटील यांनी म्हटले आहे. करमाळा महसूल कार्यालयात रिक्त पदांची भरती त्वरित करावी, अशी मागणी निवेदनाद्वारे केली आहे