बार्शी : सध्या कोरोनाचा संसर्ग सुरू असून अशा परिस्थितीत बार्शी शहरातून प्रवासी वाहतूक करणाऱ्या रिक्षाचालकांना तातडीने कोरोना प्रतिबंधक लस तात्काळ दिली जावी, अशी मागणी बार्शी शहर रिक्षा सेनेचे अध्यक्ष राजेंद्र मुळे यांनी नगरपालिकेचे मुख्याधिकारी यांच्याकडे निवेदनाव्दारे केली आहे.
तहसीलदार, ग्रामीण रुग्णालयाचे तालुका आरोग्यधिकारी, नगराध्यक्ष, नगर पालिकेचे विरोधी पक्षनेते यांनाही भेटून निवेदनाद्वारे मागणी करण्यात आली. कारोना काळात प्रवासी वाहतूक करताना प्रवाशांना बाधित आहात काय, अशी विचारणा केली जात आहे. बाधितांनाही रिक्षातून घेऊन जाताना संसर्गही चालकांना होण्याची शक्यता नाकारता येत नाही. काही प्रवासी, गर्भवती महिला, शिवाय कोरोनासंबधी आजारी रुग्ण, वयोवृद्ध रिक्षातून जातात. त्यामुळे अशा वेळी कोरोनापासून रिक्षा चालकांना संरक्षण मिळावे म्हणून बार्शीतील रिक्षाचालकांना तात्काळ प्रतिबंधक लस द्यावी, अशी मागणी संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे.
---
फोटो : १८ बार्शी
मुख्याधिकारी अमिता दगडे पाटील यांना निवेदन देताना रिक्षासेना अध्यक्ष राजेंद्र मुळे व सदस्य.