बार्शी : तालुक्यातील कोरोना रुग्णांसाठी ऑक्सिजन, रेमडेसिवीर इंजेक्शन व कोरोना लस दोन्ही डोस वाढवून देण्याची मागणी भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने जिल्हाधिकारी यांच्याकडे केली आहे.
बार्शीत दवाखान्याची संख्या जास्त आहे. त्यामुळे सर्वच ठिकाणचे रुग्ण येथे येतात, बार्शी तालुक्यात वाढणारे रुग्णांचा ताण आहे. बार्शीत मृतांची संख्यादेखील जास्त आहे. अशा परिस्थितीत बार्शी तालुक्याचे लोकप्रतिनिधी, आमदारांनी कोरोना रुग्णांसाठी ऑक्सिजन, रेमडेसिविर इंजेक्शन व कोरोना लसीचा पहिला व दुसरा डोस वाढवून देण्याचा मुद्दा उपस्थित केला होता. त्याचप्रमाणे कोरोनाची एक लस घेण्यासाठी तीन ठिकाणी नोंदणी करावी लागत आहे. लसीकरणावेळी गर्दी व गोंधळाचे वातावरण आहे. त्यावर तातडीने प्रशासनाने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी कम्युनिस्ट पक्षाचे राज्य कौन्सिल सदस्य तानाजी ठोंबरे, जिल्हा सचिव प्रवीण मस्तूद, अनिरुद्ध नखाते, शौकत शेख यांनी केली आहे.