एप्रिल व मे महिन्यात दहावी, बारावीची बोर्ड परीक्षा होणार आहेत. यामुळे विद्यार्थ्यांना शाळा, महाविद्यालयात जाणे क्रमप्राप्त झाले आहे. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये, यासाठी ऑनलाईन शिक्षण देण्याचे प्रयत्न सुरू ठेवले होते. परंतु ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षण घेण्यात अडचणीचा सामना करावा लागला.
सध्या पाचवी ते बारावीचे वर्ग सुरू झाले आहेत. शैक्षणिक नुकसान भरून काढण्यासाठी ग्रामीण भागातील पालक आणि विद्यार्थ्यांनी ऑफलाईन अध्यापनास पसंती दिली आहे. त्यासाठी शाळा, महाविद्यालय जाण्याची इच्छा असूनही सोय नसल्याने अडचण होत आहे. खासगी प्रवासी वाहतूक पूर्णपणे बंद असून एसटीच्या ठराविक फेऱ्या सुरू आहेत. सांगोला आगारातून विद्यार्थ्यांना पास देण्यास सुरुवात केली असली तरी शाळांच्या वेळेत एसटीच्या फेऱ्या सुरू कराव्यात, अशी मागणी विद्यार्थी, पालकांमधून केली जात आहे.
कोट ::::::::::::::::::
सांगोला आगारातून दैनंदिन एसटीच्या २०० फेऱ्या सुरू आहेत. शालेय विद्यार्थ्यांना पास देण्यास सुरुवात केली आहे. शाळांची मागणी आल्यास एसटीच्या फेऱ्या वाढविण्यात येतील.
- पांडुरंग शिकारे
आगारप्रमुख, सांगोला