यावेळी जि. प. सदस्य आनंद तानवडे, दयानंद पाटील, कोरवली ग्रामपंचायत सदस्य सिद्धाराम म्हमाणे, दयानंद तारके, आदी उपस्थित होते. कोरवली येथील प्राथमिक आरोग्य उपकेंद्राचे मागील दहा वर्षांपूर्वी बांधकाम झाले आहे. दोन वर्षांतच फरशी खचल्याने तसेच बांधकामाला भेगा पडल्याने आरोग्य उपकेंद्र बंद पडले. ६५ लाख रुपये खर्च करून निकृष्ट बांधकामामुळे कोरवली परिसरातील नागरिकांना आरोग्याच्या समस्येसाठी भटकंती करावी लागत आहे. या कामाला नव्याने मंजुरी देऊन संपूर्ण बांधकाम पुन्हा करण्यात यावे अशी मागणी जिल्हा परिषद सदस्य शैला गोडसे तसेच कोरवली ग्रामस्थांनी केली आहे.
---
फोटो : २३ कुरुल
कोरवली आरोग्य उपकेंद्र कामाची चौकशी व कारवाई व्हावी व दुरुस्तीसाठी जादा निधी उपलब्ध करून देण्यासाठी झेडपी सदस्य शैला गोडसे, सिद्धाराम म्हमाणे, दयानंद पाटील यांनी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अर्जुन गुंडे यांना निवेदन देताना.
----