लॉकडाऊनच्या काळात मागणी घटल्याचे कारण देत, खासगी व सहकारी दूध संघांनी दूध खरेदीचे दर १० ते १५ रुपये प्रतिलीटरने पाडले. मात्र, ग्राहकांसाठीचे विक्रीचे दर तसेच ठेवत शेतकरी व ग्राहकांची प्रचंड लुटमार केली आहे. लॉकडाऊनच्या काळात मागणी घटल्याचा बाऊ करून, ज्या खासगी व सहकारी दूध संघांनी दूध खरेदीचे दर पाडले. त्या सर्व दूध संघाचे ऑडिट करून प्रत्यक्षात दुधाची मागणी किती घटली व किती दर कमी दिला आहे, याबाबत सखोल चौकशी करा व परिस्थितीचा गैरफायदा घेऊन शेतकऱ्यांची लूटमार करणाऱ्या खासगी व सहकारी दूध संघावर कठोर कारवाई करा, केलेली लूटमार वसूल करून ती शेतकऱ्यांना परत करा, अशी मागणी तहसीलदार सुशील बेल्हेकर यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
लूटमार करणाऱ्या दूध संस्थांच्या चौकशीची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 19, 2021 4:15 AM