सोलापूर : महसूल विभागातला शेवटचा घटक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कोतवाल संघटनेच्या वतीने प्रलंबित मागण्यांसंदर्भात निवासी उपजिल्हाधिकारी यांची भेट घेऊन पदोन्नती देण्याची मागणी केली.
कोतवाल संवर्गातून शिपाई संवर्गात पदोन्नती गेल्या ११ वर्षांपासून प्रलंबित आहे. शासन निर्णयानुसार कोरोनाने मरण पावलेल्या कोतवाल कर्मचारी यांच्यासाठी ५० लाख रुपये वारसांना मदत मिळणे अपेक्षित आहे. अशा अनेक प्रलंबित मागण्या जिल्हाधिकारी यांच्याकडे करण्यात आल्या. ८ ऑगस्टपर्यंत कोतवालांच्या प्रलंबित मागण्या मान्य न झाल्यास जिल्ह्यातील कोतवाल ९ ऑगस्टपासून बेमुदत काम बंद आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. यावेळी महसूल संघटनेचे प्रदेश उपाध्यक्ष शंतनू गायकवाड, कोतवाल संघटनेचे प्रदेश सरचिटणीस कृष्णा शिंदे, जिल्हाध्यक्ष विठ्ठल गुरव, जिल्हा उपाध्यक्ष राहुल तोडकरी, मल्लिनाथ बाळगी, महिला प्रतिनिधी सुलोचना देशमुख, एम.एस. कोळी, शफील वाडीकर, सरचिटणीस शिवानंद कोळी, हणमंत सानप, सुनील मुलगे, नाना पवार, अनिल भोसले, बालाजी ओव्हाळ, गौतम ठोकळे, धानय्या स्वामी, महादेव खिलारे, धानय्य क्षीरसागर, दत्ता कदम, हमीद शेख, सुनील कोळी, समाधान सूर्यगंध, बाळासाहेब खेंदाड, सुदर्शन गुरव उपस्थित होते.
----
२८ दक्षिण
पदोन्नती देण्याबाबत कोतवाल संघटनेच्या वतीने निवासी जिल्हाधिकारी यांना निवदेन देताना संघटनेचे पदाधिकारी.